Reddy : बॅंकेच्या सभासदांना १५ टक्के लाभांश देणार : रेड्डी

‘एन. साई सोसायटी’ला ४ कोटी ५७ लाख रुपये नफा
Cooperative Bank
Cooperative BankAgrowon

शिराढोण : रांजणी (ता. कळंब) येथील नॅचरल उद्योग समूहाच्या एन. साई मल्टी स्टेट को-ऑपरेटीव्ह सोसायटीला(Co-Operative Bank) यावर्षी ४ कोटी ५७ लाख ५७ हजार ६१२ रुपये नफा झाला आहे. बँकेच्या सभासदांना टक्के लाभांश देण्यात येणार आहे,’’ अशी माहिती अध्यक्ष संभाजीराव रेड्डी (Sambhanjirao Reddy)यांनी दिली.

Cooperative Bank
Lumpy Skin : लम्पी स्कीन’वरील औषधोपचार, लसीकरणाचा खर्च शासन करणार

एन. साई मल्टी स्टेट को-ऑपरेटीव्ह सोसायटीची १० वी वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवारी (ता.१९) संस्थेच्या कार्यालयात घेण्यात आली. अहवाल वाचनावेळी रेड्डी यांनी माहिती दिली. या वेळी नॅचरल उद्योग समुहाचे तांत्रिक संचालक अनिल ठोंबरे, पांडुरंग आवाड, हर्षल ठोंबरे,

Cooperative Bank
Lumpy Skin : ...साहेब तुम्ही आलात, म्हणून ते इथे आलेत

लेखापरीक्षक ऋषीकेश पाटील, सहाय्यक सरव्यवस्थापक प्रदीप ठोंबरे उपस्थित होते.

रेड्डी म्हणाले, ‘‘बँकेच्या सोळा शाखांत २२४ कोटी ९१ लाख रुपयांच्या ठेवी आहेत. ६५ कोटी ६४ लाख रुपये कर्जवाटप करण्यात आले आहे. बँकेच्या ५४१७ सभासदांचे तीन कोटी ७२ लाख ४३ हजार रुपये भाग भांडवल आहे.

Cooperative Bank
Lumpy Skin : ‘लम्पी स्कीन’च्या संसर्गात झपाट्याने वाढ

तर बँकेची वसुली ९८ टक्के आहे.’’

प्रदीप ठोंबरे यांनी सूत्रसंचालन केले. तर किशोर डाळे यांनी आभार मानले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com