Solar Energy Production : सौरऊर्जेपासून १५ हजार किलोवॉट वीजनिर्मिती

गेल्या काही वर्षांपासून सौरऊर्जा निर्मितीला गती आली आहे. ‘रूफ टॉप सोलर’ला अनेकांनी पसंती दिली आहे.
Solar Energy
Solar Energy Agrowon

Yavatmal News : गेल्या काही वर्षांपासून सौरऊर्जा निर्मितीला (Solar Energy) गती आली आहे. ‘रूफ टॉप सोलर’ला अनेकांनी पसंती दिली आहे. जिल्ह्यात सद्यःस्थितीत महावितरणच्या चार उपविभागांत १५ हजार ७७४ किलोवॉट वीजनिर्मिती (Power Generation) केली जात आहे.

सध्या विजेचे संकट अनेक भागांत पाहायला मिळत आहे. उन्हाळा सुरू होताच विजेच्या मागणीत वाढ झाली आहे. त्यामुळे अनेक भागांत वीजपुरवठा खंडित होत असल्याचे प्रकार वाढले आहेत.

ज्यांचा वीजवापर जास्त आहे, अशा अनेक ठिकाणी ‘रूफ टॉप सोलर’लावण्यात आले आहेत. वीजनिर्मिती सोबतच हरित ऊर्जेचा वापर केला जात आहे.

सद्यःस्थितीत महावितरणच्या यवतमाळ, पुसद, पांढरकवडा तसेच दारव्हा या चार उपविभागांत १५ हजार ७७४ किलोवॉट विजेची निर्मिती केली जात आहे. सौरऊर्जेतून नागरिकांची गरज भागत असून, वीजबिलातही दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात एक हजार ३४४ ठिकाणी ‘रूफ टॉप सोलर’ बसविले आहेत.

Solar Energy
Solar Energy : अमरावतीतील अंगणवाड्या सौरऊर्जेमुळे प्रकाशमान

नागरिकांचा कल त्याकडे वाढला आहे. यातून नागरिकांची आर्थिक बचत होत आहे. सद्यःस्थितीत यवतमाळ विभागात ६६५ जण सौरऊर्जेद्वारे सात हजार ६९५ किलोवॉट वीजनिर्मिती करीत आहेत.

Solar Energy
Solar Energy : अपारंपरिक ऊर्जेचा वापर

पुसद विभागात २७१ ग्राहक एक हजार ९५४, पांढरकवडा २०८ ग्राहक तीन हजार ६२ तर दारव्हा विभागात दोनशे ग्राहक दोन हजार २६३ किलोवॉट विजेची निर्मिती करीत आहेत.

यवतमाळ उपविभागात सर्वाधिक ग्राहक

सौरप्रकल्प उभारण्यात यवतमाळ उपविभाग अव्वलस्थानी आहे. यवतमाळ विभागात सर्वाधिक सात हजार ६९५ किलोवॉट वीजनिर्मिती केली जात आहे. येणाऱ्‍या काळात या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com