‘पवना’तून १५ हजार क्युबिक मिटर गाळ काढला

मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्या पुढाकारातून पवना धरणातून गाळ काढण्याचे काम सुरु आहे.
‘पवना’तून १५ हजार क्युबिक मिटर गाळ काढला
Pavana DamAgrowon

पुणे : मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे (Shrirang Barne) यांच्या पुढाकारातून पवना धरणातून (Pavna Dam) गाळ (Sludge) काढण्याचे काम सुरु आहे. पाणीसाठ्यात वाढ व्हावी, असा त्यामागचा उद्देश आहे. होण्याच्या उद्देशाने मागील पंधरा ते वीस दिवसांत धरणातून तब्बल १५ हजार क्युबिक मीटर गाळ काढला आहे. मागील सात वर्षांपेक्षा यंदा सर्वाधिक गाळ काढण्यात आला आहे. गाळ काढण्याचे काम अद्यापही सुरू आहे. त्यामुळे पवना धरणातील पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे.

शेतीमध्ये हा गाळ पसरविला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचाही फायदा होत आहे. पिंपरी-चिंचवड, मावळातील गावांना, शेतीला पाणीपुरवठ्याचे पवना धरण मुख्य स्रोत आहे. धरणाचे काम १९७२ साली पूर्ण झाले. परंतु, धरणातील साठवण क्षमता वाढविण्यासाठी कोणीही प्रयत्न केले नाहीत. मात्र, बारणे यांच्या पुढाकारातून धरणातील पाण्याची क्षमता वाढण्यासाठी मागील सात वर्षांपासून गाळ काढला जात आहे. आतापर्यंत ५४ हजार क्युबिक मीटर गाळ काढला आहे.

तीव्र उष्णतेमुळे मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन झाले. परिणामी, पवना धरणातील पाणीसाठा वेगात कमी झाला. त्यामुळे यंदा धरणातील गाळ काढण्यास मोठी संधी आहे. त्यादृष्टीने परवानगी घेऊन १५ मेपासून गाळ काढण्यास सुरूवात केली. पवना धरणाच्या चारही बाजूंनी गाळ काढला जात आहे. वाहन चालकांनी डंपरच्या क्षमतेपेक्षा जास्त गाळ भरून वाहतूक करू नये. गावकऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही, याची खबरदारी घ्यावी, अशा सूचना बारणे यांनी केल्या.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com