Agriculture Scheme : सिंधुदुर्गमध्ये कृषी योजनांसाठी १ हजार ५१४ प्रस्ताव

जिल्ह्यासाठी ८३ लाखांची तरतूद
 Agriculture Scheme
Agriculture SchemeAgrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी ः जिल्हा परिषद (Zila Parishad) कृषी विभागामार्फत (Agriculture Department) येणाऱ्या योजनांसाठी १ हजार ५१४ प्रस्ताव कृषी विभागाकडे प्राप्त झाले आहेत. या योजनांसाठी जिल्हा परिषदेने ८३ लाख रुपयांची तरतूद केली आहे.

 Agriculture Scheme
Agriculture Scheme : ‘कृषी’च्या १२ योजनांसाठी ८३ लाख रुपयांची तरतूद

जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत जिल्ह्यात विविध कृषी विकास योजना राबविण्यासाठी २०२२-२३ करिता ८३ लाख निधीची तरतूद करण्यात आली आहे. या निधीतून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अनुदानावर आधारित कृषी साहित्य आणि कीटकनाशके पुरविली जातात. यामध्ये ग्रासकटर, ताडपत्री, प्लॅस्टिक क्रेट, नारळशिडी, विद्युत पंप, पीव्हीसी पाइप, फवारणी पंप, पोर्टेबल स्प्रे पंप, डिझेल पंप आदींचा समावेश आहे.

जिल्हा परिषदेने २८ सप्टेंबरपूर्वी शेतकऱ्यांकडून प्रस्ताव मागविले होते. आठही पंचायत समिती स्तरावर हे प्रस्ताव एकत्र करून ते जिल्हा परिषदेकडे प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यातील सुमारे १ हजार ५१४ शेतकऱ्यांनी जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव दिले आहेत. या प्रस्तावांची छाननी करून लाभार्थी निवड केली जाणार आहे. यापूर्वी लाभार्थी निवडीकरिता जिल्हा परिषद सदस्यांची शिफारस बंधनकारक होती. परंतु, जिल्ह्यात सध्या प्रशासक असल्यामुळे कोणत्याही शिफारशीशिवाय शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे.

 Agriculture Scheme
Agricultural Marketing Scheme : शेतकरी कंपनीसाठी ‘स्मार्ट' प्रकल्पांतर्गत कृषी पणन योजना

कृषी साहित्यनिहाय प्रस्ताव
कृषी साहित्याचे नाव प्रस्ताव संख्या
ग्रासकटर ४८४
ताडपत्री ३००
प्लॅस्टिक क्रेट १४६
नारळशिडी ७४
विद्युतपंप १६६
पीव्हीसी पाइप ७०
स्प्रे पंप ८१
पोर्टेबल स्प्रे पंप १३५
डिझेल पंप ५८

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com