Landslide : भुस्खलनामुळे १६० कुटुंबांचे स्थलांतर

२६ ऑगस्ट २०२२ रोजी घुग्घुस शहरातील आमराई वॉर्डातील रहिवासी गजानन मडावी यांचे घर अचानक भुस्खलनामुळे ६० ते ७० फूट जमिनीखाली गेले. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही.
Chandrapur Landslide News
Chandrapur Landslide News Agrowon

चंद्रपूर : घुग्घुस येथील आमराई वॉर्डात झालेल्या भुस्खलनामुळे (Landslide) परिसरातील इतरही घरांना धोका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कोणतीही जीवितहानी (Loss Of Live) होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासनाने सुरक्षेच्या कारणास्तव ४०० बाय १५० मीटर परिसरातील १६० घरे खाली करून कुटुंबांचे स्थलांतर केले आहे.

Chandrapur Landslide News
Landslide : दरडप्रवण गुटके गावातील १४ कुटुंबांचे स्थलांतर

२६ ऑगस्ट २०२२ रोजी घुग्घुस शहरातील आमराई वॉर्डातील रहिवासी गजानन मडावी यांचे घर अचानक भुस्खलनामुळे ६० ते ७० फूट जमिनीखाली गेले. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. या घटनेची माहिती प्राप्त होताच जिल्हा प्रशासन, नगर पालिका प्रशासन, वेकोली प्रशासनाने घटनास्थळी भेट देऊन ५० मीटर परिसरातील घरे खाली करून सर्व कुटुंबांना नगर परिषदेच्या शाळेत स्थलांतरित केले.

Chandrapur Landslide News
Landslide : ओडिशात भूस्खलनामुळे १० घरांचे नुकसान

या घटनेचे शास्त्रीय कारण जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केंद्र शासनाचे खाण सुरक्षा निर्देशालयाचे संचालक सागेश कुमार, वेकोलीच्या तांत्रिक विभागाचे गुप्ता, भुविज्ञान व खनिकर्म विभागाचे उपसंचालक सुरेश नैताम, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे वरिष्ठ भूवैज्ञानिक मंगेश चौधरी, भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण, मध्य विभाग नागपूरचे वरिष्ठ भूवैज्ञानिक भूपेश उरकुडे, आशिष बारसाकडे यांच्याशी संपर्क केला असून उक्त जागेचे शास्त्रीय सर्वेक्षण व कारणमीमांसा आदी बाबी तपशीलवार तपासून घेत आहे. आमराई वॉर्डातील घटनास्थळापासूनचे एक हेक्टर क्षेत्र धोकादायक घोषित केले आहे. सर्व घरे खाली करून कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविण्यात येत आहे.

‘दहा हजार रुपयांची मदत देणार’

वने व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सूचनेनुसार प्रत्येक कुटुंबाला मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून १० हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याबाबतची कार्यवाही सुरू आहे. खाण सुरक्षा निर्देशालय, भारत सरकार यांच्या सूचनेनुसार घटनास्थळापासूनच्या ४०० बाय १५० मीटर परिसरातील १६० घरे खाली करून उक्त जागेवर वावर करण्यास स्थानिकांना मनाई करण्यात आली आहे. स्थलांतरित केलेल्या कुटुंबांना पुढील सोय होईपर्यंत भाडे तत्त्वावर घर घेऊन राहायचे असल्यास त्यांच्या मासिक भाड्याची रक्कम व प्राथमिक गरजांकरिता आवश्यक निधी वेकोली प्रशासनाकडून देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितांना दिल्या आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com