Cooperative Election : ‘तापी सूतगिरणी’साठी १६३ उमेदवार रिंगणात

निवडणुकीत २१ जागांसाठी चुरस
 Election
ElectionAgrowon

चोपडा : येथील तापी सहकारी सुतगिरणीच्या (Tapi Sahakari Sut Girani) २०२२ ते २०२७ या पंचवार्षिक निवडणुकीत एकूण २१ जागांसाठी शुक्रवारी (ता. ४) शेवटच्या दिवसापर्यंत १६३ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. निवडणुकीत (Election) इच्छुकांची भाऊगर्दी पाहता निवडणुकी चुरशीची होईल, असे चित्र आजतरी दिसत आहे. परंतु २३ नोव्हेंबरला माघार असल्याने माघारीअंती निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल.

तापी सहकारी सुतगिरणीच्या २०२२ ते २०२७ या पंचवार्षिक निवडणुकीत कापूस उत्पादक मतदारसंघात एकूण १५ जागांसाठी ९८ उमेदवारी अर्ज, बिगर कापूस उत्पादक मतदारसंघात एका जागेसाठी १३ अर्ज, इतर मागास प्रवर्ग मतदारसंघात एका जागेसाठी २४ अर्ज, भटक्या जाती जमाती मतदारसंघात एका जागेसाठी ७ अर्ज, महिला

राखीव मतदारसंघात दोन जागांसाठी १५ अर्ज, अनुसूचित जाती जमाती मतदारसंघात एक जागेसाठी ६ अर्ज, असे एकूण १६३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहे. अर्जांची छाननी ७ नोव्हेंबरला असून, ९ ते २३ नोव्हेंबरपर्यंत माघार घेणे, २४ नोव्हेंबरला उमेदवारांना चिन्हांचे वाटप तर ४ डिसेंबरला निवडणुकीसाठी मतदान घेण्यात येणार असून, ५ डिसेंबरला मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येईल,

 Election
Crop damage : शिरोळ तालुक्यात पंचनामे पूर्ण

अशी माहिती चोपडा येथील सहाय्यक निबंधक एस. एफ. गायकवाड यांनी दिली. तसेच निवडणुकीच्या प्रक्रियेसाठी जिल्हा उपनिबंधक यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निबंधक एस. एफ. गायकवाड, सहकार अधिकारी खुलेश पाटील, सचिव दत्तात्रय पाटील, सुतगिरणीतील लिपिक विवेक पाटील, भाऊसाहेब पाटील व पंकज पाटील यांनी

सहकार्य केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com