Weather Updates: ‘पिंपळगाव जोगे’ क्षेत्रात १६७ मिलिमीटर पाऊस

अधूनमधून पाऊस पडत असल्याने खरीप पेरण्यांना (Kharip Sowing) काहीसा दिलासा मिळत होता. परंतु शेतकऱ्यांना जोरदार पावसाची प्रतीक्षा होती. त्यातच मागील काही दिवसांपासून मॉन्सून (Monsoon) चांगलाच सक्रिय झाल्याने कोकणसह पुणे जिल्ह्याच्या अनेक भागांत पावसाने चांगलाच जोर धरला आहे.
Weather Updates
Weather UpdatesAgrowon

पुणे : गेल्या आठ दिवसांपासून जिल्ह्याच्या विविध भागांत पाऊस पडत आहे. यामध्ये धरणाच्या पाणलोट क्षेत्रात (Catchment Area) पावसाचा जोर अधिक वाढला आहे. रविवारी (ता.१०) सकाळी आठ वाजेपर्यंत पिंपळगाव जोगे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सर्वाधिक १६७ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ होण्यास सुरूवात झाली आहे.

जून महिन्यात पावसाने चांगलीच हुलकावणी दिली. त्यामुळे खरीप हंगाम वाया जातो की काय अशी स्थिती झाली होती. अधूनमधून पाऊस पडत असल्याने खरीप पेरण्यांना (Kharip Sowing) काहीसा दिलासा मिळत होता. परंतु शेतकऱ्यांना जोरदार पावसाची प्रतीक्षा होती. त्यातच मागील काही दिवसांपासून मॉन्सून (Monsoon) चांगलाच सक्रिय झाल्याने कोकणसह पुणे जिल्ह्याच्या अनेक भागांत पावसाने चांगलाच जोर धरला आहे.

पूर्व भागात पावसाचे प्रमाण कमी असले तरी काही प्रमाणात हलक्या सरी बरसत आहेत. त्यामुळे खरिपातील पिकांना दिलासा मिळत आहे. परंतु पश्चिम पट्ट्यात जोरदार पाऊस बरसत आहे. त्यामुळे भात खाचरे भरून वाहू लागली आहेत. ओढे, नाले खळाळून वाहत आहे.

धरणाच्या पाणलोट क्षेत्रात १ जून ते १० जुलैपर्यंत पाऊस (मि.मी)

पिंपळगाव जोगे ३७८, माणिकडोह ३९९, येडगाव २२५, वडज १८०, डिंभे ३२३, घोड ८६, विसापूर ३७, चिल्हेवाडी १७५, कळमोडी ४५१, चासकमान २२२, भामा आसखेड २३१, वडिवळे ६४९, आंध्रा ३४७, पवना ६५०, कासारसाई २८६, मुळशी ७६७, टेमघर ७६८, वरसगाव ६४२, पानशेत ६६२, खडकवासला १४७, गुंजवणी ६१०, नीरा देवघर ५५२, भाटघर २२८, वीर १११, नाझरे १२१, उजनी २३८.

धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाऊस (मिमी)

धरण... पाऊस

कळमोडी...१३७

वरसगाव, पानशेत...१२६

गुंजवणी...११५

वडिवळे...११०

मुळशी...१०९

पवना...१०५

नीरा देवघर...१०५

माणिकडोह...८८

आंध्रा...८५

चिल्हेवाडी...८४

येडगाव...८३

चासकमान...७३

भाटघर...६१

डिंभे...४८

भामा आसखेड...४५

कासारसाई...३८

उजनी...३९

वडज...३२

खडकवासला...३२

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com