राज्यात कृषी सहायकांची १,७५७ पदे रिक्‍त

रिक्‍त पदांमुळे कृषी खात्याचा कारभार खिळखिळा झाला आहे. विस्तार कामात देखील कृषी विभागाची यंत्रणा पिछाडल्याचा आरोप भारतीय कृषी संशोधन परिषदेचे तत्कालीन महासंचालक डॉ. त्रिलोचन मोहपात्रा यांनी केला होता.
Agriculture Department
Agriculture DepartmentAgrowon

नागपूर ः रिक्‍त पदांमुळे कृषी खात्याचा (Agriculture Department) कारभार खिळखिळा झाला आहे. विस्तार कामात देखील कृषी विभागाची यंत्रणा पिछाडल्याचा आरोप भारतीय कृषी संशोधन परिषदेचे (Indian Council Of Agriculture Research) तत्कालीन महासंचालक डॉ. त्रिलोचन मोहपात्रा (Dr. Trilochan Mohpatra) यांनी केला होता. परिणामी शेतकऱ्यांना सेवा मिळण्यातही अडचणी येत असताना त्याच्याशी राज्यकर्त्यांना कोणतेच देणेघेणे नसल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळेच गेल्या चार वर्षांपासून साधी कृषी सेवकांची पदभरती देखील करण्यात आली नसल्याचे धक्‍कादायक वास्तव समोर आले आहे.

Agriculture Department
Cotton Boll Worm : यंदाही कापूस पीक बोंड अळीच्या संकटात

अमरावती येथे कृषिमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या आढावा बैठकीत आमदार बच्चू कडू यांनी जिल्हा मुख्यालयी असलेल्या कृषी कार्यालयात कर्मचाऱ्यांना प्रतिनियुक्‍ती तसेच रिक्‍तपदांचा मुद्दा जोरकसपणे मांडला होता. त्याची दखल घेत कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी भरती करण्याबाबत सकारात्मक असल्याचे जाहीर केले. मात्र, राज्यात रिक्‍तपदांमुळे परिस्थिती हाताबाहेर गेल्याची स्थिती आहे. रिक्‍तपदांमुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढत असतानाच दुसरीकडे पदभरती होत नसल्याने बेरोजगारांमध्ये नैराश्‍य वाढत आहे.

Agriculture Department
Soybean : सोयाबीन आणि युरियाची मात्रा

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१८ मध्ये कृषी सेवकांची भरती करण्यात आली होती. त्यानंतर आकृतिबंध नसल्याचे कारणाआड आजवर भरतीला खो देण्यात आला आहे. २००९ साली कृषी विभागाचा आकृतिबंध तयार करण्यात आला होता. नियमानुसार दर दहा वर्षांनी तो अपडेट करावा लागतो. परंतु १३ वर्षानंतरही ही प्रक्रिया राबविली गेली नाही. परिणामी कृषी सेवकांची भरती प्रक्रिया रखडली आहे. कृषी पदविकाधारक असलेल्या टाकळी देशमुख (बीड) येथील कल्याण अंगदराव शिंदे यांनी राज्यातील कृषी सहाय्यकाच्या मंजूर, रिक्‍तपदाची माहिती मंत्रालयाकडे मागितली होती. त्यानुसार त्याला मे-२०२२ पर्यंतच्या रिक्‍तपदाबाबत कळविण्यात आले आहे. त्यानुसार राज्यात सद्यःस्थितीत मजूर ११५९९ पदांपैकी ९८४२ पदे रिक्‍त आहेत.

तीन गावांसाठी एक कृषी सहायक राहतो. परंतु सध्या एका कृषी सहायकाकडे बारा गावांची जबाबदारी आहे. सध्या नुकसान सर्व्हेक्षण, पंचनाम्याची कारवाई सुरू आहे. कृषी सहायक एकच असल्याने तो १२ गावांतील सर्वेक्षण व पंचनाम्याचे काम कसे करणार, असे अनेक प्रश्‍न निर्माण होत असताना शासनाकडून आकृतिबंधाच्या आड पदभरती केली जात नाही, हे वास्तव आहे. त्यामुळे कृषी पदवीधरांमध्ये नैराश्‍य वाढत आहे. सध्याच्या सरकारने भरतीबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा.

- संदीप भावले,

कृषी पदवीधर, औरंगाबाद

कृषी सहायकांच्या पदांची स्थिती

विभाग--मंजूर पदे--रिक्‍त पदे

कृषी आयुक्‍तालयात - १२ ः ००

पुणे- १७७९ ः २४९

कोल्हापूर - १२११ ः २१५

ठाणे - १२४४ ः २८८

नाशिक - १९४४ ः २८७

औरंगाबाद - ११२५ ः १३४

लातूर - १४६८ ः ९०

अमरावती ः १७७२ ः १४१

नागपूर ः १४९४ ः ३५३

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com