अमरावती जिल्ह्यातील भूजलपातळीत १.७७ मीटरने वाढ

वर्षी सरासरीपेक्षा ११४ टक्के अधिक झालेल्या पावसामुळे भूगर्भातील पाणीपातळीत वाढ नोंदविण्यात आली आहे.
ground water level
ground water level Agrowon

अमरावती : या वर्षी सरासरीपेक्षा ११४ टक्के अधिक झालेल्या पावसामुळे भूगर्भातील पाणीपातळीत (ground water level) वाढ नोंदविण्यात आली आहे. भूजल (Ground water) सर्वेक्षण विभागाने नोंदविलेल्या निरीक्षणानुसार, जिल्ह्यातील चौदाही तालुक्यांतील भूजलपातळीत १.७७ मीटरपर्यंत वाढ झाली आहे.

ground water level
Orange Crop Insurance: संत्रा उत्पादकांचे आज मंथन बैठक

भूजल सर्वेक्षण विभागाने चौदाही तालुक्यांतील १५० विहिरींचे निरीक्षण केल्यानंतर त्यांनी भूजल पातळीतील वाढ नोंदविली आहे. जिल्ह्यात सरासरी ८५५ मिमी पाऊस अपेक्षित असताना यंदा तो प्रत्यक्षात १००६ मिमी इतका झाला. जुलै व ऑगस्टमधील अतिवृष्टी, त्यानंतर सततचा पाऊस यात भरीसभर म्हणजे दोन सप्टेंबरमधील पावसाची रिपरिप सुरूच राहिली.

पावसाळ्यात तब्बल ८४ महसूल मंडलांत अतिवृष्टी नोंदविण्यात आली आहे. शेतीपिकांसाठी हा पाऊस नुकसानदायक ठरला असला तरी भूजलाचे पुनर्भरण झाले. गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत यंदा प्रथमच याप्रमाणात भूजलपातळीत वाढ झाली आहे. भूजल सर्वेक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात पाच वर्षांची ७.३९ मीटर सरासरी भूजल पातळी आहे. त्यातुलनेत सध्या ५.६२ मीटरची नोंद झाली आहे.

ground water level
Crop Loan : रब्बी पीककर्जाचे १३.६६ टक्के वाटप

जिल्ह्यातील चिखलदरा व धारणी या पहाडपट्ट्यातील तालुक्यात सरासरीच्या तुलनेत ९५ टक्क्यांपर्यंत पावसाची झाली नोंद आहे. त्यामुळे दोन्ही तालुक्यांतील भूजलस्तरामध्ये ०.१० ते ०.२० मीटरपर्यंत वाढ झाली आहे. त्याचवेळी पहाडपट्टीच्या पायथ्याशी असलेल्याअचलपूर तालुक्यात ४.३० व चांदूरबाजार तालुक्यात ४.९७ मीटर एवढी भूजल पातळीत वाढ झाली आहे.

तालुक्यातील भूजलवाढीची स्थिती (मीटरमध्ये)

अमरावती १.५१, तिवसा २, मोर्शी १.१०, वरुड २.२७, अचलपूर ४.३०, चांदूरबाजार ४.९७, दर्यापूर १.७८, अंजनगावसुर्जी २.१०, धारणी ०.१०, चिखलदरा ०.२०, धामणगावरेल्वे ०.९०, भातकुली २.५०, नांदगाव खंडेश्वर ०.३७ व चांदूररेल्वे ०.६७

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com