Farm Mortgage Loan Scheme : ‘शेतीमाल तारण’ चा १७८ शेतकऱ्यांना लाभ

शेतीमाल तारण कर्ज योजनेअंतर्गत परभणी जिल्ह्यातील परभणी, सेलू, मानवत, पाथरी या चार कृषी उत्पन्न समितीमार्फत यंदा सोमवार (ता. १२) पर्यंत १७८ शेतकऱ्यांना ६ हजार ३६१.५२ क्विंटल शेतीमालावर १ कोटी ९५ लाख ४१ हजार ९०० रुपये कर्ज वितरित करण्यात आले आहे.
शेतमाल तारण कर्ज योजना
शेतमाल तारण कर्ज योजनाagrowon

परभणी ः शेतीमाल तारण कर्ज योजनेअंतर्गत परभणी जिल्ह्यातील परभणी, सेलू, मानवत, पाथरी या चार कृषी उत्पन्न समितीमार्फत यंदा सोमवार (ता. १२) पर्यंत १७८ शेतकऱ्यांना ६ हजार ३६१.५२ क्विंटल शेतीमालावर १ कोटी ९५ लाख ४१ हजार ९०० रुपये कर्ज वितरित करण्यात आले आहे. या शेतकऱ्यांनी तारण ठेवलेल्या एकूण शेतीमालाची किंमत २ कोटी ८८ लाख २९ हजार ३० रुपये होते, अशी माहिती पणन मंडळाचे जिल्हा व्यवस्थापक पंकज चाटे यांनी दिली.

शेतमाल तारण कर्ज योजना
Farm Produce Mortgage Scheme : ‘शेतीमाल तारण’ चा ७५७ शेतकऱ्यांना लाभ

शेतीमालाचे बाजार भाव कोसळल्यानंतर शेतकऱ्यांचे नुकसान होते. या परिस्थितीत शेतीमाल तारण कर्ज घेऊन तातडीच्या गरजा भागविता येतात. तेजी आल्यानंतर शेतीमालाची विक्री केल्यास फायदा होऊ शकतो. त्यासाठी राज्य पणन महामंडळांतर्गत शेतीमाल तारण कर्ज योजना राबविली जात आहे. याअंतर्गत शेतमालाच्या किमतीच्या ७५ टक्के कर्ज ६ टक्के व्याज दराने दिले जाते. पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक गजानन वाघ, व्ही. डी. सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली परभणी कृषी उत्पन्न बाजार समिती स्वनिधीतून ही योजना राबवीत आहे.

शेतमाल तारण कर्ज योजना
Farmer Loan : कर्ज फेडणाऱ्या ४९ हजार शेतकऱ्यांना लाभ

सेलू, मानवत, पाथरी येथील बाजार समित्या पणन मंडळाच्या अर्थसाह्याने ही योजना राबवीत आहेत. परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत ४४ शेतकऱ्यांना ८९ लाख ५९ हजार ७८५ रुपये किमतीच्या १ हजार ७२०. ७२ क्विंटल सोयाबीनवर ५५ लाख ४८ हजार ५८८ रुपये तारण कर्जवाटप करण्यात आले. सेलू बाजार समितीने २२ शेतकऱ्यांना ३४ लाख ७२ हजार ६५० रुपये किमतीचे ८००. ५० क्विंटल सोयाबीनवर २२ लाख ३७ हजार ४०० रुपये तारण कर्ज दिले. मानवत बाजार समितीने ८७ शेतकऱ्यांना १ कोटी २५ लाख ४५ हजार ३०० रुपये किंमतीचे २ हजार ९२१ क्विंटल सोयाबीनवर ९१ लाख १ हजार रुपये, तसेच एका शेतकऱ्यास १ लाख ३० हजार ७५ रुपये किमतीच्या २३.६५ क्विंटल हळदीवर ९१ हजार रुपये तारण कर्ज दिले आहे.

पाथरी बाजार समितीने २४ शेतकऱ्यांना ३८ लाख ५१ लाख २९५ रुपये किमतीच्या ८९५.६५ क्विंटल सोयाबीनवर २६ लाख ४४ हजार ९०० रुपये तारण कर्ज दिले आहे. पणन मंडळातर्फे सेलू बाजार समितीत ७ लाख ३१ हजार रुपये, मानवत बाजार समितीस ६५ लाख ९४ हजार रुपये, पाथरी बाजार समितीस १७ लाख ५९ हजार ९०० रुपये, असे एकूण ९१ लाख ७५ हजार ९०० रुपये रकमेची प्रतिपूर्ती करण्यात आली आहे, असे चाटे यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com