Water Conservation : धुळ्यात बांधणार १७९० वनराई बंधारे

कृषी सहसंचालक यांची माहिती; संरक्षित सिंचन क्षेत्रात वाढ होण्यासाठी कृषी विभागाचे पाउल
Water Conservation
Water ConservationAgrowon

धुळे : जिल्ह्यात संरक्षित सिंचन क्षेत्रात (Protected Irrigation Area) वाढ व्हावी म्हणून एक हजार ७९० वनराई बंधारे (Forestry dams) बांधण्यात येणार आहेत. त्यासाठी ग्रामस्थांनी सहकार्य करावे, असे आवाहन नाशिक विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ (Mohan Wagh) यांनी केले.

Water Conservation
Lumpy Skin : शेतकऱ्यांची दौलत दीड महिन्यापासून बंद दाराआड

नाशिक विभागात यंदा चांगले पर्जन्यमान झाले आहे. सद्य:स्थितीत ओढे, नाल्यांमध्ये पाणी उपलब्ध आहे. पाण्याचा प्रवाह पारंपरिक पद्धतीने अडवून जलसाठा करून बिगर पावसाळी हंगामातील पिकांसाठी संरक्षित पाणी,

Water Conservation
Lumpy Skin : ‘लम्पी स्कीन’ने दगावलेल्या सर्व जनावरांसाठी आता मदत

ग्रामपातळीवर पाण्याची गरज काही अंशी भागविण्यासाठी उपलब्ध साधनसामग्रीचा (सिमेंट/खतांची रिकामी पोती, माती, वाळू आदी) वापर करून तात्पुरत्या स्वरूपात बांध बांधता येतो. त्यालाच वनराई बंधारा म्हणतात.

वनराई बंधारे पाणलोट क्षेत्रात तसेच या क्षेत्राच्या बाहेरही घेता येतात. ज्या गावात पाणलोट विकासाची कामे सुरु नाहीत, अशा गावात वनराई बंधाऱ्यांची कामे मोठ्या प्रमाणात घेतल्यास टंचाईवर काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो. वनराई बंधाऱ्यांसाठी पाणलोट क्षेत्राची (Catchment) अट नसते.

त्यासाठी तांत्रिक निकष विचारात घेऊन जागेची निवड करणे लाभदायक असते. प्रथम नाल्याची पाहणी करून कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त जलसाठा करणे शक्य होईल, अशी जागा निवडली जाते. नाला अरुंद व खोल असावा, साठवण क्षमता पुरेशी असावी.

नाल्याच्या तळाचा उतार सर्वसाधारणपणे दोन ते तीन टक्के असावा लागतो. या बंधाऱ्याची उंची दीड मीटरपेक्षा जास्त नसावी. या बंधाऱ्याचा बांधकाम कालावधी हा पावसाळा संपल्यानंतर नाल्यांमधून वाहून जाणारे पाणी अडविणे आवश्यक आहे. त्यासाठी कामाचा कालावधी सात ते पंधरा दिवसांपर्यंत असावा.

पावसाळ्यानंतरचा सुरू असलेला पाण्याचा प्रवाह विचारात घेऊन सर्वसाधारणपणे प्रवाह बंद होण्यापूर्वी अडविला जाईल, या दृष्टीने ठरविण्यात येतो. वनराई बंधाऱ्यामुळे जनावरांना पिण्याचे पाणी, रब्बी व उन्हाळी भाजीपाला, कडधान्ये, कलिंगड, रब्बी तृणधान्ये, गळीत धान्ये घेण्यासाठी मदत होते.

अपेक्षित संरक्षित सिंचन क्षेत्र या बंधाऱ्याद्वारे सरासरी दोन हेक्टर क्षेत्रात संरक्षित सिंचन उपलब्ध होईल. काही ठिकाणी जास्तीचा जलसाठा उपलब्ध होऊन सिंचन क्षेत्रात वाढ होवू शकेल, असे श्री. वाघ यांनी सांगितले. धुळे- नंदुरबारचे उद्दिष्ट...

नाशिक विभागात नाशिक जिल्हा-५२००, धुळे जिल्हा- १७९०, नंदुरबार जिल्हा-१८६०, जळगाव जिल्हा-२७१०, असे एकूण-११ हजार ५६० बंधारे बांधण्याचा कार्यक्रम निश्चित आहे. या माध्यमातून सुमारे २३ हजार हेक्टर क्षेत्र संरक्षित सिंचनाखाली येईल. वनराई बंधारे बांधण्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा आहे. त्यामुळे ग्रामस्थांना सहभागाचे आवाहन आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com