Rabi Crop Insurance : गेल्या रब्बीसाठीचा १८ कोटी ७८ लाखांचा पीकविमा मंजूर

पंतप्रधान पीकविमा योजना रब्बी हंगाम २०२१-२२ मध्ये गहू, हरभरा व रब्बी ज्वारीसाठी ४६ हजार १५९ विमाधारकांना १८ कोटी ७८ लाखांचा विमा मंजूर झाला आहे.
Rabi Season
Rabi SeasonAgrowon

नांदेड : पंतप्रधान पीकविमा (Crop Insurance) योजना रब्बी हंगाम (Rabi Season) २०२१-२२ मध्ये गहू, हरभरा व रब्बी ज्वारीसाठी ४६ हजार १५९ विमाधारकांना १८ कोटी ७८ लाखांचा विमा मंजूर झाला आहे. या योजनेत ७६ हजार ५०७ शेतकऱ्यांनी (Farmer) दोन कोटी ८७ लाखांसह केंद्र व राज्य सरकारचा एकूण ५६ कोटी१५ लाखांचा विमा (Insurance) हप्ता भरला होता. हा विमा परतावा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाल्याची माहिती कृषी विभागाच्या (Department of Agriculture) सूत्राने दिली.

Rabi Season
Crop Damage Compensation : अतिवृष्टिग्रस्तांना अनुदानासाठी दावरवाडी फाट्यावर ‘रास्ता रोको’

जिल्ह्यात रब्बी हंगाम २०२१-२०२२ मध्ये पंतप्रधान पीकविमा योजना इफ्को टोकीयो जनरल विमा कंपनीकडून गहू, रब्बी ज्वारी व हरभरा या पिकासाठी राबविण्यात आली होती. ही विमा योजना जिल्ह्यातील सर्वच सोळा तालुक्यांत राबविण्यात आली होती. यात जिल्ह्यातील ७६ हजार ५०७ अर्जदार शेतकऱ्यांनी ५५ हजार ३६९ हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित केले होते.

यात १९१ कोटी पाच लाख विमा निर्धारित केली होती. गहू, हरभरा व रब्बी ज्वारीसाठी शेतकऱ्यांनी दोन कोटी ८७ लाखांचा विमा हप्ता भरला होता. तर राज्य सरकारने २६ कोटी ६४ लाख तर केंद्राने २६ कोटी ६४ असा एकूण ५६ कोटी १५ लाखांचा विमा हप्ता कंपनीकडे जमा करण्यात आला होता.

दरम्यान, गहू, रब्बी ज्वारी व हरभरा या पिकाला वातावरणाचा फटका बसल्याने १६ तालुक्यांपेकी धर्माबाद, हदगाव, हिमायतनगर, कंधार, किनवट, लोहा, मुदखेड, मुखेड व नायगाव या तालुक्यांतील ४६ हजार १५९ शेतकऱ्यांना विमा मंजूर झाला आहे. यात ३४ हजार ३५८ हेक्टरवरिल पिकांच्या भरपाईपोटी १८ कोटी ७८ लाख ९६ हजारांचा विमा परतावा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्राने दिली.

Rabi Season
Farmer Death : शेतकऱ्यांच्या आत्महत्येनंतर गावकऱ्यांचा संताप

निकनिहाय मंजूर विमा व शेतकरी संख्या

पीक शेतकरी संख्या विमा संरक्षीत क्षेत्र जमा रक्कम

गहू (जि) २,३५१ १,१३९ १ कोटी १३ लाख

हरभरा ३,८६३ ३०,१३१ १५ कोटी ८२ लाख

रब्बी ज्वारी ५,३४५ ३०८६ १ कोटी ८३ लाख

एकूण ४६,१५९ ३४,३५८ १८ कोटी ७८ लाख

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com