Eknath Shinde : राज्यात १८ नवीन संवर्धन राखीव क्षेत्रे घोषित

राज्यात नवीन १८ आणि ७ प्रस्तावित संवर्धन राखीव क्षेत्रे घोषित करण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी (ता. ४) मान्यता दिली.
Eknath Shinde
Eknath ShindeAgrowon

पुणे ः राज्यात नवीन १८ आणि ७ प्रस्तावित संवर्धन राखीव क्षेत्रे (Conservative Reserve) घोषित करण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मंगळवारी (ता. ४) मान्यता दिली. नवीन संवर्धन राखीव क्षेत्रामध्ये नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी, सुरगाणा, ताहराबादचा समावेश असून, प्रस्तावित संवर्धन राखीव क्षेत्रामध्ये सप्तशृंग गड समाविष्ट करण्यात आला आहे. आताच्या मान्यतेमुळे राज्यात राखीव क्षेत्राची संख्या ५२ होणार आहे. त्यातून राज्यात १३ हजार चौरस किलोमीटर क्षेत्र संरक्षित होण्यास मदत होईल.

Eknath Shinde
Cotton Rate : पाकिस्तान, बांगलादेशकडून कापूस आयात वाढणार

संवर्धन राखीव क्षेत्रातील वन्यजीवांचे संवर्धन करताना त्या भागातील ग्रामस्थांच्या दैनंदिन जीवनात अडचण येणार नाही, त्यांचे हक्क बाधित होणार नाहीत याची दक्षता घेण्याचे निर्देश श्री. शिंदे यांनी दिले. मंत्रालयात श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य वन्यजीव मंडळाची १९ वी बैठक झाली. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, वन विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी, प्रधान मुख्य वनसंरक्षक डॉ. वाय. एल. पी. राव, वन्यजीव मंडळाचे सदस्य सचिव तथा प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये आदी उपस्थित होते.

राज्य वन्यजीव निधी

अभयारण्य, पर्यावरण संवेदनशील क्षेत्र आणि व्याघ्रभ्रमण मार्गात ज्या प्रकल्पांना वन्यजीव मान्यता आवश्यक आहे, त्यांच्याकडून बाधित क्षेत्रातील प्रकल्प किमतीच्या २ टक्के रक्कम वन्यजीवांच्या संवर्धनासाठी जमा केली जाते. आता खासगी प्रकल्प यंत्रणेकडून ४ टक्के रक्कम घेण्याबाबतची सूचना श्री. मुनगंटीवार यांनी मांडली.

Eknath Shinde
Soybean Verity : ताण सहन करणारी सोयाबीन जात विकसित

त्यास मान्यता देण्यात आली. तसेच ही रक्कम जमा करण्यासाठी राज्य वन्यजीव निधी स्थापन करण्याच्या सूचना श्री. मुनगंटीवार यांनी केली. त्याचबरोबर ४ टक्के रकमेतील १ टक्का निधी हा राज्यातील जैवविविधतेसाठी वापरण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

उपशमन (मिटीगेशन) योजनेत सुचविलेल्या प्रकल्पांच्या वाढीव रकमेचा भार संबंधित प्रकल्प यंत्रणेने उचलण्याचे बंधनकारक करण्याबाबत श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले. वन्यजीवांमुळे शेती तसेच मनुष्य जीवितहानीच्या घटना घडतात, अशा प्रकरणांमध्ये संबंधितास तत्काळ नुकसान भरपाई देता यावी, यासाठी उणे प्राधिकार (निगेटिव्ह ट्रेझरी) सुविधा पुनश्‍च उपलब्ध करण्याची विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांना केली.

नवीन संवर्धन राखीवचे क्षेत्र

(आकडे चौरस किलोमीटरमध्ये)

- पुणे आणि रायगड जिल्ह्यातील- वेल्हे-मुळशी : ८७.४१ आणि लोणावळा : १२१.२०

- पुणे-ठाणे जिल्ह्यातील-नानेघाट : ९८.७८

- पुणे जिल्ह्यातील- भोरगिरीगड : ३७.६४

- नाशिक जिल्ह्यातील- दिंडोरी : ६२.१०,

सुरगाणा : ८६.२८, ताहराबाद : १२२.४५

- नंदूरबार जिल्ह्यातील- कारेघाट : ९७.४५, चिंचपाडा : ९३.९१

- रायगड जिल्ह्यातील- घेरा मानिकगड : ५३.२५ व अलिबाग : ६०.०३

- ठाणे-पुणे जिल्ह्यातील- राजमाची : ८३.१५

- ठाणे जिल्ह्यातील- गुमतारा : १२५.५०

- पालघर जिल्ह्यातील- जव्हार : ११८.२८, धामणी : ४९.१५, अशेरीगड : ८०.९५

- सांगली जिल्ह्यातील- आटपाडी : ९.४८

- चंद्रपूर जिल्ह्यातील- एकारा : १०२.९९

प्रस्तावित संवर्धन राखीव क्षेत्र

राष्ट्रीय उद्यानालगत आणि अभयारण्यालगत अथवा दोन संरक्षित क्षेत्र जोडणाऱ्या भूप्रदेशातील प्राणी, वनस्पती यांच्या अधिवासाचे संरक्षण करण्याच्या हेतूने संवर्धन राखीव क्षेत्र घोषित केले जातात. प्रस्तावित संवर्धन राखीव क्षेत्रांमध्ये नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंग गड, ठाणे जिल्ह्यातील मोरोशीचा भैरवगड, औरंगाबाद जिल्ह्यातील धारेश्‍वर, त्रिकुटेश्‍वर, कन्नड, पेडकागड, तर नांदेड जिल्ह्यातील किनवटचा समावेश आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com