Organic Farming : अक्षयकल्प ऑर्गनिकमध्ये पडणार १८०० नव्या फार्म्सची भर

बंगळुरू येथील सेंद्रीय दुग्ध पदार्थ उत्पादक कंपनी अक्षयकल्प ऑर्गनिक यांची विस्ताराची योजना आहे.
Organic Farming
Organic FarmingAgrowon

बंगळुरू येथील सेंद्रीय दुग्ध पदार्थ उत्पादक कंपनी अक्षयकल्प ऑर्गनिक (Akshaykalp Organic) यांची विस्ताराची योजना आहे. सध्या सुरू असलेल्या प्रकल्पांमध्ये एकूण १८०० फार्म्सची भर पडणार असून क्लस्टर प्रोडक्शन्स वाढवणार असल्याची माहिती अक्षयकल्पचे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शशी कुमार (Shahshi Kumar) यांनी दिली आहे. क्लस्टर फार्म्स (Cluster farms) म्हणजे स्वतंत्ररीत्या कार्यरत असलेले पण एकमेकांजवळ असलेले फार्म्स. सध्या कंपनीच्या क्लस्टर फार्ममध्ये ७८० स्वतंत्र फार्म्स आहेत. या क्लस्टर फार्ममधून तीन शहरांना दुग्ध उत्पादनांचा (Dairy Producers) पुरवठा केला जातो.

"जुलै २०२३ पर्यंत तिपतूर क्लस्टरमध्ये १५०० फार्म्सची आणि चेन्नई क्लस्टरमध्ये ३०० फार्म्सची भर पडेल. त्यापैकी १०० फार्म्स हे जानेवारी २०२३ पर्यंत सुरू होतील. काही प्रमाणपत्रांची आणि आवश्यक मानकांची पूर्तता करण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी लागू शकतो," अशी माहिती शशी कुमार यांनी दिली.

Organic Farming
Banana Cultivation : केळी लागवड ८३ हजार हेक्टरवर स्थिरावणार

कंपनीकडून बंगळुरू, चेन्नई आणि हैदराबाद शहरातील ६०,००० घरांना दुग्ध उत्पादनांचा पुरवठा होतो. या ठिकाणची रोजची दुग्ध उत्पादन क्षमता ७०००० लीटर आहे. सध्या ज्या ठिकाणी कंपनी कार्यरत आहे त्याच शहराच्या इतर भागांवर लक्ष केंद्रित करून विस्तार करण्याची योजना कंपनीने मांडली आहे. असं असलं तरी नव्या शहरांमध्ये जसं की मुंबई, पुणे, कोची या शहरांमध्ये सुद्धा दूध पुरवठा सुरू करण्याचा कंपनीचा मानस आहे.

Organic Farming
Banana Disease : केळीवरील सिगाटोका रोगाची लक्षणे कशी ओळखायची?

२०२२ या आर्थिक वर्षात कंपनीने ११७ कोटींचे महसुली उत्पन्न निर्माण केले. कुमार सांगतात, "गेल्या पाच वर्षांत आमचा वाढीचा आलेख चढता आहे. आणि या आर्थिक वर्षात आमचा महसूल २०० कोटी इतका होईल अशी आशा आहे."

"उत्पादनांमध्ये वाढ करण्याचे आव्हान आमच्यासमोर आहे. आणि दरवर्षी आहे त्यापेक्षा जास्त म्हणजे उत्पादनांची दुप्पट निर्मिती करणे देखील अशक्य आहे. त्यामुळे आम्हाला या व्यवसायात सावध पावलं टाकणं गरजेचं आहे. पुढील पाच वर्षांत दरसाल ४०-५० टक्के दराने वाढ करण्याची आमची योजना आहे. यात २००० फार्म्स आमच्यासोबत जोडले जातील आणि ५०० कोटींचा व्यवसाय उभा केला जाईल."

कृषी पर्यटनाची योजना

कंपनीचे बंगळुरू आणि चेन्नई या ठिकाणी फार्म्स आहेत. कुमार सांगतात की "जास्तीत जास्त लोकांपर्यंत सेंद्रीय उत्पादनांची माहिती पोहोचावी हा आमचा उद्देश आहे. या फार्मच्या निर्मितीमध्ये सर्वांत मोठी गुंतवणूक कोणती असेल तर ती वेळेची आहे. कारण असे फार्म उभे करण्यासाठी वेळ लागतो."ते पुढे सांगतात की फार्म्सचे संवर्धन करणे ही सर्वांत मोठी गुंतवणूूक आहे. कारण यासाठी तीन ते पाच वर्षांचा कालावधी लागतो. त्याचबरोबर गायी विकत घेण्यासाठी ६-७ लाख खर्च येतो.

शशी कुमार यांच्या मते सेंद्रीय उत्पादनांच्या विपननासाठी फार्म व्हिजिटचा मोठा वाटा आहे. "ही योजना उत्तमरीत्या कार्यरत ठेवणं आमच्या विपननाच्या दीर्घकालीन योजनेचा भाग आहे. नवीन गिऱ्हाईक शोधण्यापेक्षा, लोकांमध्ये या उत्पादनांची जागृती करणं आमच्या व्यवसायवाढीसाठी फायदेशीर ठरेल."दोन वर्षांपूर्वी आम्ही ही योजना सुरू केली आणि आता प्रत्येक आठवड्याअखेर अंदाजे १०० लोक फार्म व्हिजिटसाठी येतात असं कुमार सांगतात.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com