Dam Water Pune : पुणे जिल्ह्यातील १९ धरणांनी गाठला तळ

पुणे जिल्ह्यात लहान-मोठी एकूण २६ धरणे आहेत. पुणे जिल्ह्यातील या धरणांतील पाण्याचा वापर उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात वाढला होता.
Water Shortage
Water ShortageAgrowon

पुणे ः जून महिना संपत आला तरी अद्याप पुरेसा पाऊस (No Sufficient Rainfall) झालेला नाही. पुणे जिल्ह्यातील धरणक्षेत्रात अजूनही दमदार पाऊस (Heavy Rain) नाही. त्यामुळे ऐन पावसाळ्यात जिल्ह्यातील अनेक धरणांनी तळ (Dam Water Level) गाठला असून १९ धरणे कोरडी पडली आहेत. तर, उजनी धरणात मृत पाणीसाठा (Dead Water Stock) उपलब्ध आहे. सध्या जिल्ह्यात जोरदार पावसाची प्रतीक्षा लागून राहिली आहे.

Water Shortage
`उजनी`ची पाणी पातळी अखेर ५० टक्क्यांपर्यंत

पुणे जिल्ह्यात लहान-मोठी एकूण २६ धरणे आहेत. पुणे जिल्ह्यातील या धरणांतील पाण्याचा वापर उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात वाढला होता. या धरणांतील पाण्याचा वापर शेतीसाठी तसेच पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथील नागरिकांना होतो. गेल्या तीन ते चार महिन्यांपासून अतिउष्णतेमुळे धरणातील पाण्याची मागणी होती. त्यामुळे धरणातील पाण्याची पाणीपातळी झपाट्याने कमी झाली आहे. सध्या जिल्ह्यातील धरणांत अवघा १०.८२ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. येत्या काळात पाऊस न झाल्यास जवळपास सर्वच धरणांतील पाणीसाठा आणखी कमी होण्याची शक्यता आहे. तर, पिंपळगाव जोगे, माणिकडोह, येडगाव, वडज, घोड, विसापूर, चिल्हेवाडी, कळमोडी, चासकमान, वडिवळे, कासारसाई, मुळशी, टेमघर, खडकवासला, गुंजवणी, नाझरे, नीरा देवघर, उजनी ही धरणे कोरडी पडली असून उर्वरित धरणात अल्प पाणीसाठा आहे.

सध्या येडगाव धरणातून डाव्या कालव्याला १४००, वीर धरणातून ३०० क्यूसेकने विसर्ग सोडलेला आहे. खडकवासला, वरसगाव, पानशेत धरणातून बंद पाइपद्वारे शहरांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. जिल्ह्यात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून अनेक भागात ढगाळ हवामान असून काही भागात पाऊस होत आहे. परंतु धरणातील पाणीपातळी वाढविण्यासाठी जोरदार पावसाची गरज असून येत्या दहा ते पंधरा दिवसांत जोरदार पाऊस झाल्यास धरणांत पाण्याची आवक सुरू होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दृष्टिक्षेपात

जिल्ह्यातील धरणातील पाणीसाठा (टीएमसीमध्ये)

माणिकडोह - ०.७६, येडगाव - ०.२५, वडज- ०.११, डिंभे - ०.६३, घोड - ०.१८, विसापूर - ०.०२, चिल्हेवाडी - ०.०३, कळमोडी - ०.१०, चासकमान - ०.५७, भामा आसखेड - २.२५, वडुवळे - ०.०२, आंध्रा - १.६३, पवना - १.५१, कासारसाई - ०.१५, वरसगाव - १.१५, पानशेत - १.१६, खडकवासला - ०.३३, गुंजवणी - ०.६७, नीरा देवधर - ०.३७, भाटघर - १.३४, वीर - ३.८२, उजनी- ५.८९

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com