
पारगाव मेमाणे, ता. पुरंदर ः ‘‘सुमारे दीडशे वर्षांपूर्वी सावित्रीबाई फुले (Savitribai Phule) यांनी पेटवलेली शिक्षणाची ज्योत आज जगाला ज्ञानाचा प्रकाश देत आहे. त्यांच्या स्त्री शिक्षणाच्या (Women Education) पवित्र कार्यास त्रिवार अभिवादन करणे हीच खरी त्यांना आदरांजली ठरेल,’’ अशी भावना पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप (Sanjay Jagtap) यांनी व्यक्त केली.
सावित्रीबाई फुले यांच्या १९२ व्या जयंतीनिमित्त महात्मा फुले यांचे मूळ गाव खानवडी (ता. पुरंदर) येथे पुरंदर पंचायत समिती, ग्रामपंचायत खानवडी, महात्मा फुले स्मारक समिती व ग्रामस्थांच्या वतीने आयोजित अभिवादन कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.
‘‘सावित्रीबाईंच्या कार्यकर्तृत्वामुळे राष्ट्रपती या सर्वोच्च पदावर जाण्याचा मान महिलेला मिळाला आहे, अन्यथा चूल आणि मूल या सूत्रात भारतीय महिला अडकल्या असत्या,’’ अशी आदरांजली महात्मा फुले स्मारक समितीचे अध्यक्ष सुदामराव इंगळे यांनी या वेळी व्यक्त केली.
‘‘फुले दांपत्याच्या पुण्यतिथी व जयंती कार्यक्रमातील मान्यवरांच्या सत्काराचा खर्च टाळून गुणवंत शालेय मुलांच्या गुणगौरवासाठी त्याची तरतूद करावी,’’ अशी सूचना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रेय झुरंगे यांनी अभिवादनावेळी व्यक्त केली.
या वेळी महात्मा फुले सभा मंडपाचे लोकार्पण, निपुण भारतअंतर्गत घेतलेल्या स्पर्धेतील विद्यार्थ्यांचा सन्मान, जिल्हा परिषद शाळा गुरोळी व दिवडी या शाळांचे विविध गुणदर्शन कार्यक्रम, शिवशंभो प्रतिष्ठानच्या वतीने ३५ महिला शिक्षकांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
सावित्रीबाई फुले जयंतीचे औचित्य साधून खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाने महिला आरोग्य तपासणी शिबिराचे, तसेच रक्तदान शिबिराचे सुनील धिवार व योगेश रासकर यांनी आयोजन केले होते. या वेळी प्रा. कदम यांनी सावित्रीबाई फुले या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
या वेळी गटविकास अधिकारी अमर माने, गटशिक्षणाधिकारी चंद्रकांत उगले, पंचायत समिती सदस्या सुनीता कोलते, यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विस्तार अधिकारी पांडुरंग मेमाणे यांनी केले. सूत्रसंचालन बाळासाहेब फडतरे, रामदास होले, संदीप जगताप यांनी तर केले. तर आभार सरपंच स्वप्नाली होले यांनी मानले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.