Lumpi Skin : ‘लम्पी स्कीन’च्या औषधोपचारासाठी २ कोटींचा निधी राखीव

२०२३-२४ च्या प्रारूप आराखड्यामध्ये मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेसाठी ३६ कोटी, कोरोनावरील खर्च भागविण्यासाठी ३० कोटीांचा निधी राखून ठेवण्यात आला आहे.
Lumpy Skin
Lumpy SkinAgrowon

सांगली ः जिल्ह्यातील जनावरांच्या लम्पी स्कीन आजारावर (Lumpy Skin Disease) प्रतिबंधक उपाययोजना करण्यासाठी १ कोटी ८६ लाख रुपयांच्या कामास मान्यता देण्यात आली असून लम्पी स्कीन चर्मरोग औषधोपचारासाठी २ कोटींचा निधी राखून ठेवण्यात आला आहे. (Special Fund for Lumpy Skin)

तसेच जिल्ह्यातील ५०० स्मार्ट अंगणवाडी करण्यास मान्यता दिली असून जिल्हा वार्षिक योजना २०२३-२४ साठी ४१६ कोटी ६४ लाखांच्या प्रारूप आराखड्यास मान्यता दिली असल्याची माहिती, पालकमंत्री तथा कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी दिली.

जिल्हा नियोजन समितीची बैठक शुक्रवारी (ता. १३) जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. या वेळी खासदार संजय पाटील, खासदार धैर्यशील माने, आमदार अरुण लाड, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार अनिल बाबर, आमदार मानसिंगराव नाईक, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुमन पाटील, आमदार विक्रमसिंह सावंत, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, महापालिका आयुक्त सुनील पवार, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अंचल दलाल, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव, समाज कल्याण सहायक आयुक्त जयंत चाचरकर यांच्यासह कार्यान्वयीन यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

Lumpy Skin
Lampi In Maharashtra : लंपी रोगामुळे 22 जनावरांचा मृत्यू | ॲग्रोवन

प्रकल्प आणि निधी तरतूद

१) ५० स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी ३९.६५ कोटी मंजूर

२) मिरज मेडिकल कॉलेजमध्ये एमआरआय खरेदीसाठी १६ कोटी

३) मिरज मेडिकल कॉलेज येथे ६०० किलोवॅट क्षमतेचा सौर प्रकल्प

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com