
Amravati News : जिल्ह्यात १६ ते १९ मार्च २०२३ दरम्यान अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) व गारपिटीमुळे पिके आणि फळपिकांचे नुकसान (Crop Damage) झाले. त्याचे पंचनामे पूर्ण करण्यात आले असून, नुकसान भरपाईसाठी एकूण २ कोटी ३८ लक्ष ५३ हजार ६३० रुपये एवढ्या अनुदान निधीचा मागणी प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. विवेक घोडके यांनी दिली.
पाऊस व गारपिटीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे तहसीलदारांकडून पूर्ण करण्यात आले. पंचनामे झाल्यानंतर ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान आढळून आलेल्या क्षेत्रामध्ये बागायत पिकाखालील बाधित क्षेत्र १ हजार २३५.१४ हेक्टर आर. असून, बाधित शेतकऱ्यांची संख्या २ हजार ४८० एवढी आहे. यासाठी अपेक्षित अनुदानाची मागणी २ कोटी ९ लाख ९७ हजार ३८० रुपये एवढी आहे.
फळपिकाखालील बाधित क्षेत्र १२२.४३ एवढे व बाधित शेतकऱ्यांची संख्या १४७ आहे. भरपाईसाठी २७ लक्ष ५४ हजार ६७५ रुपये एवढी अनुदानाची मागणी आहे. जिरायती पिकाखालील बाधित क्षेत्र ११.९५ हेक्टर आर. असून, बाधित शेतकऱ्यांची संख्या ३६ आहे. अपेक्षित अनुदानाची मागणी १ लाख १ हजार ५७५ रुपये एवढी आहे.
अमरावती जिल्ह्याचे एकूण बाधित क्षेत्र १ हजार ३६९.५२ हेक्टर आर. असून बाधित शेतकऱ्यांची संख्या २ हजार ६६३ एवढी आहे. भरपाईसाठी एकूण २ कोटी ३८ लाख ५३ हजार ६३० रुपयांच्या अनुदान मागणीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे.
केंद्र शासनाच्या नैसर्गिक आपत्ती निकषाच्या धर्तीवर नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित होणाऱ्या आपदग्रस्त व्यक्तींना सन २०२२-२३ ते सन २०२५-२६ या कालावधीमध्ये द्यावयाच्या मदतीचे सुधारित दर व निकष निश्चित करण्यात आले आहेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.