Crop Insurance : पीकविम्यासाठी शेतकऱ्यांकडून २ लाखांवर पूर्वसूचना

पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत एकूण ६ लाख ७१ हजार ५७३ प्रस्तावांद्वारे शेतकऱ्यांनी ४ लाख ३८ हजार ८१२ हेक्टरवरील पिके विमा संरक्षित केली आहेत.
Crop Insurance
Crop Insurance Agrowon

परभणी ः परतीचा पाऊस (Monsoon Rain) सुरूच असल्यामुळे परभणी जिल्ह्यातील पीक नुकसानीची (Crop Damage) व्याप्ती वाढली आहे. पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत (Crop Insurance Scheme) स्थानिक नैसर्गिक आपत्ती (Natural Calamity) या जोखिमेअंतर्गत पीकविमा (Crop Insurance) परतावा मिळावा, या साठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी २ लाख ८३५ पूर्वसूचना (इंटिमेशन) दाखल केल्या आहेत. त्यापैकी १ लाख १७ हजार ७६३ पूर्वसूचना स्वीकारण्यात आल्या आहेत. तर विविध कारणांनी ८३ हजार ७२ पूर्वसूचना नाकारण्यात आल्या आहेत. बुधवार (ता.१२) पर्यंत ३८ हजार ८२१ ठिकाणचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे.

Crop Insurance
Crop Insurance : पीक नुकसानीबाबत विमा कंपनीला कळवा

परभणी जिल्ह्यात खरिपात ५ लाख १० हजार ७२४ हेक्टरवर पेरणी झाली. त्यात सोयबीन २ लाख ६९ हजार ८०० हेक्टर, कपाशी १ लाख ७९ हजार ४४७ हेक्टर, तर ३९ हजार ४८८ हेक्टर तुरीचा समावेश आहे.

पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत एकूण ६ लाख ७१ हजार ५७३ प्रस्तावांद्वारे शेतकऱ्यांनी ४ लाख ३८ हजार ८१२ हेक्टरवरील पिके विमा संरक्षित केली आहेत. त्यात सोयाबीनसाठी ४ लाख ८ हजार ९४ शेतकऱ्यांनी ३ लाख ३४ हजार ९४ हेक्टर, कपाशीसाठी ६५ हजार ५६८ शेतकऱ्यांनी ३१ हजार १०४ हेक्टर, तुरीसाठी ९३ हजार ८२३ शेतकऱ्यांनी ३६ हजार ६३३ हेक्टरसाठी विमा संरक्षण घेतले.

Crop Insurance
Crop Insurance : पीक नुकसानीबाबत विमा कंपनीला कळवा

जुलै महिन्यातील अतिवृष्टी तसेच सततचा पाऊस, ऑगस्टमधील दीर्घ पावसाचा खंड, त्यानंतर आता परतीच्या पावसामुळे शेतातील उभे, कापणी केलेल्या सोयाबीन, कपाशी, तूर आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

पीकविमाधारक शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे २ लाख ८३५ पूर्वसूचना दाखल केल्या आहेत. त्यात कॉल सेंटरद्वारे ६२ हजार ५८, सुविधा केंद्रामार्फत १४ हजार ३१२, पीकविमा पोर्टलवर १ लाख २४ हजार ४६५ पूर्वसूचना दिल्या आहेत. आजवर ३८ हजार ८२१ पूर्वसूचनांनुसार सर्वेक्षण पूर्ण झाले. तर ७८ हजार ९४२ पूर्वसूचनांचे सर्वेक्षण सुरु होते.

पूर्वसूचना नाकारण्याची कारणे...

शेतकऱ्यांनी दुष्काळ या पर्यायांतर्गत दाखल २० हजार १९ पूर्वसूचना नाकारण्यात आल्या आहेत. एकापेक्षा जास्त वेळा दाखल केलेल्या १० हजार ६११, उशिरा दाखल केलेल्या ३२ हजार ५४५, नुकसान नमूद न केलेल्या १९ हजार ८९७ मिळून एकूण ८३ हजार ७२ पूर्वसूचना नाकारण्यात आल्या आहेत.

तालुकानिहाय पूर्वसूचना स्थिती

तालुका...एकूण पूर्वसूचना....सर्वेक्षण पूर्ण...सर्वेक्षण प्रलंबित

परभणी...३२५११...२६४१...२०४१८

जिंतूर..२५६०७...५८११...९३७२

सेलू...२५३३९...४८५५...१११०७

मानवत...१३४३८...२७२८...५३००

पाथरी...१०२३९...१७०२...४१०६

सोनपेठ...१०६९९...२६११...२९३१

गंगाखेड...२९८०६...१०५१२...२९१३

पालम...१५२२०...३९५०...४०३४

पूर्णा...३७९७६...४०११...१८७६१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com