Rain Update : वीस धरणे भरली

पावसाळा सुरु होऊन साडे तीन महिने पूर्ण झाले आहेत. जून महिन्यात कमी पाऊस झाला असला तरी उर्वरित अडीच महिन्यात पुणे जिल्हयात धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळला आहे.
Rain Update
Rain Update Agrowon

पुणे : पावसाळा (Monsoon Rainfall) सुरु होऊन साडे तीन महिने पूर्ण झाले आहेत. जून महिन्यात कमी पाऊस (Low Rainfall) झाला असला तरी उर्वरित अडीच महिन्यात पुणे जिल्हयात धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस (Heavy Rainfall In Dam Area) कोसळला आहे. रविवारी (ता. १८) सकाळी आठवाजेपर्यत अनेक धरणांच्या पाणलोट क्षेत्रात (Dam Catchment Area) जोरदार पाऊस पडला. यामुळे जिल्ह्यातील २६ धरणांपैकी वीस धरणे काठोकाठ (20 Dam's Filled In Pune District) भरली आहेत. अन्य पाच धरणांमधील पाणीसाठा (Water Storage) प्रत्येकी ९० टक्क्यांहून अधिक झाला आहे. सध्या केवळ माणिकडोह हे एकच धरण अद्याप १४ टक्के रिकामेच राहिले आहे.

Rain Update
Agriculture Supply Chain : गोदाम उभारणीद्वारे शेतीमाल विक्री व्यवस्थापन

पुणे शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारी खडकवासला प्रकल्पातील टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला ही चारही धरणे १०० टक्के भरली आहेत. यामुळे जिल्ह्यातील सर्व धरणांमध्ये मिळून रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंत २०१.०१ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. एकूण पाणीसाठ्याचे हे प्रमाण १०१ टक्के इतके आहे. जलसंपदा विभागाच्यावतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या धरणसाठा आकडेवारी अहवालातून ही बाब उघड झाली आहे.

Rain Update
Rain Update : राज्यात जोरदार पावसाचा इशारा ?

गेल्या वर्षी आजअखेरपर्यंत जिल्ह्यातील धरणांमध्ये एकूण १७८.५८ टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहिला होता. गतवर्षीच्या या पाणीसाठ्याचे प्रमाण हे ९०.०३ इतके होते. गेल्या वर्षीच्या आजअखेरपर्यंतच्या एकूण पाणीसाठ्यात यंदा २२.४३ टीएमसीने वाढ झाली आहे. यंदा एकूण पाणीसाठ्याच्या प्रमाणात ११ टक्क्यांनी वाढ झाली आहे. जिल्ह्यातील धरणांमध्ये उजनी, भामा आसखेड, माणिकडोह, चासकमान, पवना, मुळशी, टेमघर, वरसगाव, पानशेत, गुंजवणी, नीरा देवधर, भाटघर, वीर आदी प्रमुख धरणांचा समावेश आहे.

या सर्व धरणांतील मिळून एकूण प्रकल्पीय उपयुक्त साठा क्षमता ही १९८.३४ टीएमसी इतकी आहे. प्रत्यक्षात या धरणामध्ये आज अखेर २०१.०१ टीएमसी पाणी साठले आहे. उजनी धरणाच्या भिंतीची उंची फ्लॅगच्या माध्यमातून वाढविण्यात आली आहे. त्यामुळे यंदा या धरणातील एकूण उपयुक्त पाणीसाठ्याच्या क्षमतेत ६.६८० टीएमसीने वाढ झाली, असल्याचे जलसंपदा विभागातील सूत्रांनी सांगितले.

शंभर टक्के भरलेली धरणे

टेमघर, वरसगाव, पानशेत, खडकवासला, पवना, कासारसाई, कळमोडी, चासकमान, भामा आसखेड, आंध्रा, वडीवळे, शेटफळ, नाझरे, गुंजवणी, भाटघर, नीरा देवघर, वीर, डिंभे, विसापूर, उजनी

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com