G-20 Summit : जी-२० शिखर परिषदेत २० विविध मुद्यांवर चर्चा

जी-२० शिखर परिषदेत एकूण २० विविध मुद्यांवर सविस्तर चर्चा होणार आहे. यामध्ये आठ विषय हे अर्थ विषयक तर इतर १२ मुद्द्यामध्ये औद्योगिक, उद्योग, व्यापार, पर्यटन, आदी विषयांवर परिषदेचे प्रतिनिधी चर्चा करणार आहेत.
Bhagwat Karad
Bhagwat Karad Agrowon

औरंगाबाद : जी-२० शिखर परिषदेत (G-20 Summit) एकूण २० विविध मुद्यांवर सविस्तर चर्चा होणार आहे. यामध्ये आठ विषय हे अर्थ विषयक तर इतर १२ मुद्द्यामध्ये औद्योगिक, उद्योग, व्यापार, पर्यटन, आदी विषयांवर परिषदेचे प्रतिनिधी चर्चा करणार आहेत. तसेच वेरूळ, अजिंठा, दौलताबाद येथील पर्यटन तसेच औद्योगिक क्षेत्रातील प्रगतीचीही पाहणी करणार असल्याची माहिती केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ.भागवत कराड (Dr. Bhagwat Karad) यांनी शनिवारी (ता. ३) ली.

Bhagwat Karad
PDKV Crop Verity : ‘पंदेकृवि’च्या तीन वाणांना राष्ट्रीय स्तरावर मान्यता

विभागीय आयुक्त कार्यालयात जी-२० शिखर परिषदेच्या नियोजनाच्या आढावा बैठकीस रोजगार हमी योजना, फलोत्पादन तथा पालकमंत्री संदीपान भुमरे, सहकार आणि इतर मागास आणि बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, माजी विधानसभा अध्यक्ष तथा आमदार हरिभाऊ बागडे, विशेष पोलिस महानिरीक्षक के.एम.मल्लिकार्जुन प्रसन्ना, पोलिस आयुक्त डॉ.निखिल गुप्ता, जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, मनपा आयुक्त डॉ.अभिजित चौधरी, पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

डॉ. कराड म्हणाले, की भारत, इटली व इंडोनेशिया हे तीन देश जी-२० परिषदेचे आयोजन करणार आहेत. त्या अनुषंगाने १३ व १४ फेब्रुवारी २०२३ रोजी औरंगाबाद येथे होणारी जी-२० परिषद ‘महिला व बालकल्याण’ या विषयावर आधारित असणार आहे. या परिषदेच्या माध्यमातून आपल्याला जिल्ह्याचे ऐतिहासिक, सांस्कृतिक तसेच औद्योगिक दर्शन जगाला घडविण्याची संधी मिळणार आहे. जी-२० परिषद केंद्र व राज्य शासनाच्या मदतीने यशस्वी करण्यात येणार आहे. यासाठी राज्य शासनाकडून ५० कोटी रुपये इतका निधी उपलब्ध आहे.

परिषदेच्या यशस्वितेसाठी सर्व यंत्रणांनी आपापसांत समन्वयाने काम करावे. बैठकीत पालकमंत्री श्री.भुमरे यांनी परिषदेच्या प्रतिनिधींची पैठण येथे भेट आयोजित करून त्यांना जायकवाडी धरण दाखवावे तसेच जागतिक पातळीवर नावारूपाला आलेल्या पैठणी निर्मिती केंद्राची देखील भेट घडवावी अशी सूचना केली. जी-२० परिषदेच्या आयोजनाबाबत जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी सविस्तर माहिती दिली. औरंगाबाद जिल्ह्यातील ऐतिहासिक, भौगोलिक, औद्योगिक, सांस्कृतिक आदी विषयांसंबंधीच्या माहिती पुस्तिकेचे काम शेवटच्या टप्प्यात असल्याचेही त्यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com