Leopard Attack : बिबट्याच्या हल्ल्यात मृत बालकाच्या पालकांना २० लाखांची मदत

मुलगा रोहन आईसोबत शेतातून जात असताना बिबट्याने केलेल्या हल्ल्यात रोहनचा जागीच मृत्यू झाला.
Nashik Leopard Attack News
Nashik Leopard Attack NewsAgrowon

Nashik Leopard Attack News : निफाड तालुक्यातील गोदाकाठ परिसरात म्हाळसाकोरे येथे रविवारी (ता. २९) सायंकाळी साडेचारच्या सुमारास शेतीतील द्राक्ष बागेचे (Vineyard) काम आटपून घरी परतताना आईच्या हातातील रोहन ठाकरे या चिमुकल्याला बिबट्याने (Leopard Attack) ओढून घेऊन मकाच्या शेतात (Maize Farm) जखमी केले.

त्यात रोहनचा जागीच मृत्यू झाला होता. त्यानंतर निफाड तालुक्याचे आमदार दिलीप बनकर यांनी शासनाकडे पाठपुरावा केला. अखेर रोहनच्या पालकांना २० लाखांची मदत मिळाली.

मूळचे सुरगाणा तालुक्यातील म्हैसखडक येथील रहिवासी असलेले ठाकरे कुटुंब उदरनिर्वाहासाठी म्हाळसाकोरे (ता. निफाड) येथे आले होते. मुलगा रोहन आईसोबत शेतातून जात असताना बिबट्याने केलेल्या हल्ल्यात रोहनचा जागीच मृत्यू झाला.

Nashik Leopard Attack News
Leopard Attack : बिबट्याच्या हल्ल्यात महिला जागीच ठार

त्या वेळी आमदार दिलीप बनकर यांनी म्हाळसाकोरे येथे जाऊन घटनेची माहिती घेत संबंधीत कुटुंबांला आधार दिला. त्यानंतर शासनाच्या वतीने देण्यात येणारी मदत तत्काळ देण्याबाबत सबंधित यंत्रणेला सूचना दिल्या.

Nashik Leopard Attack News
Leopard Attack : चाळीसगाव तालुक्यात धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद

पाठपुरावा केल्याने वन विभागाकडून हिरामण ठाकरे व निर्मला ठाकरे यांना २० लाखांची मदत मंजूर करण्यात आली. ठाकरे कुटुंबीयांना धनादेश आमदार दिलीप बनकर यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला. येवला वनपरिक्षेत्र अधिकारी अक्षय म्हेत्रे, म्हाळसाकोरे येथील शेतकरी दत्तू मुरकुटे उपस्थित होते.

मजूर कुटुंबातील ६ वर्षांच्या बालकाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. मृत मुलाच्या पालकांना शासनाने जाहीर केलेले अर्थसाह्य मिळण्याकरिता शासन स्तरावर पाठपुरावा केला.

- आमदार दिलीप बनकर, निफाड विधानसभा मतदार संघ

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com