Ethanol Blending : पेट्रोलमध्ये दोन वर्षांत २० टक्के इथेनॉल मिश्रण

भारत सरकारने देशातील ऊर्जा आणि वाहतूक क्षेत्रात जैवइंधनाचा वापर वाढवण्यासाठी २०१८ मध्ये राष्ट्रीय जैवइंधन धोरण आणले आहे.
Ethanol
EthanolAgrowon

Ethanol Blending Program : सरकारने पेट्रोलमध्ये २०३० पर्यंत इथेनॉलचे मिश्रण २० टक्क्यांनी वाढवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. मात्र यासाठी वेगाने काम केले जात असून जेणेकरून हे लक्ष्य आता २०२५-२६ पर्यंतच पूर्ण केले जाईल, असे केंद्रीय पेट्रोलियममंत्री हरदीप सिंग पुरी (Hardipsing Puri) यांनी सांगितले.

इंडियन फेडरेशन ऑफ ग्रीन एनर्जी (आयएफजीइ) - सीबीजी (कॉम्प्रेस्ड बायोगॅस) प्रोड्यूसर्स फोरमच्या ग्लोबल सीबीजी परिषदेला संबोधित करताना मंत्री पुरी सोमवारी (ता. १७) बोलत होते.

पुरी म्हणाले, की भारत सरकारने देशातील ऊर्जा आणि वाहतूक क्षेत्रात जैवइंधनाचा वापर वाढवण्यासाठी २०१८ मध्ये राष्ट्रीय जैवइंधन धोरण आणले आहे. स्वदेशी जैवइंधन उत्पादन निव्वळ शून्य आणि आयात कमी करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल.

आम्ही पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण २०१३-१४ मधील १.५३ टक्क्यांवरून जुलै २०२२ मध्ये १०.१७ टक्क्यांपर्यंत वाढवले ​​आहे. यामुळे देशातून बाहेर जाणारे ४१,५०० कोटी रुपयांचे परकीय चलन वाचले आहे.

शेतकऱ्यांना ४०,६०० कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम वेळेवर देण्यात आली आहे आणि कार्बन डायऑक्साइड उत्सर्जनात २७ लाख टनांनी घट झाली आहे. पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रित करण्याचे २०३० पर्यंतचे उद्दिष्ट २०२५-२६ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आता करण्यात आला आहे.

Ethanol
Ethanol Production : यंदाच्या हंगामात इथेनॉल उत्पादन वाढण्याची शक्यता

ऊर्जा मिश्रणातील गॅसचा वाटा १५ टक्क्यांपर्यंत वाढविण्याचे लक्ष्य

पुरी म्हणाले, की कॉम्प्रेस्ड बायोगॅसच्या (सीबीजी) उत्पादनामुळे नैसर्गिक वायूची आयात कमी करणे, हरितगृह वायू (जीएचजी)उत्सर्जन कमी करणे, शेतीचे अवशेष जाळणे कमी करणे, शेतकऱ्यांना फायदेशीर उत्पन्न देणे, रोजगार निर्मिती आणि प्रभावी कचरा व्यवस्थापन असे अनेक फायदे होतील.

पुरी म्हणाले, की भारताला गॅस-आधारित अर्थव्यवस्था बनविण्यासाठी २०३० मध्ये भारत सरकारने ऊर्जा मिश्रणातील गॅसचा वाटा १५ टक्क्यांपर्यंत वाढविण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

Ethanol
Ethanol Market : इथेनॉलचे तेल कंपन्यांबरोबर किती झाले करार?

१५ लक्ष टन बायोगॅस (सीबीजी) उत्पादनाचे लक्ष्य

केंद्रीय मंत्री पुरी म्हणाले, ‘‘सध्या आपण आपल्या गरजेच्या ५० टक्के नैसर्गिक वायू आयात करत आहोत. बायोगॅस प्लांटच्या झपाट्याने विस्तारामुळे देशांतर्गत संसाधनांमधून आमच्या अतिरिक्त गरजा पूर्ण करण्यात मदत होईल.

ते पुढे म्हणाले, की २०२४-२५ पर्यंत ५००० व्यावसायिक संयंत्रे उभारण्याचे आणि १५ लक्ष टन बायोगॅस (सीबीजी) उत्पादन करण्याचे भारताचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य आहे, जे देशात वापरल्या जाणाऱ्या इतर वायू इंधनांची जागा घेईल. आतापर्यंत ४६ बायोगॅस प्लांट सुरू आणि विकले गेले आहेत. १०० हून अधिक रिटेल आउटलेट्स सुरू केले आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com