Rain Update : राजूरमध्ये २०० मिलिमीटर पावसाची नोंद

पुणे जिल्ह्याच्या अनेक भागांत पावसाची संततधार सुरू असून, रात्रीसह दिवसाही चांगला पाऊस पडत आहे. पूर्व भागात पावसाचा जोर कमी आहे, तर पश्चिम पट्ट्यात मुसळधार पाऊस कोळसत आहे.
Rain Update
Rain UpdateAgrowon

पुणे : पुणे जिल्ह्याच्या अनेक भागांत पावसाची संततधार (Continues Rainfall) सुरू असून, रात्रीसह दिवसाही चांगला पाऊस पडत आहे. पूर्व भागात पावसाचा जोर (Rain Force) कमी आहे, तर पश्चिम पट्ट्यात मुसळधार पाऊस (Heavy Rainfall In West Region)कोळसत आहे. जुन्नरमधील राजूर येथे सर्वाधिक २०० मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाल्याने धरणातील पाणीसाठ्यात (Dam Water Level) वेगाने वाढ होत आहे.

जुलैच्या सुरुवातीपासूनच जोरदार पावसाला सुरुवात झाली असून, हवेली, मावळ, मुळशी, भोर, वेल्हा, खेड, जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यात काही ठिकाणी अतिवृष्टीसदृश्य पाऊस पडत आहे. या पावसामुळे भात खाचरे तुंडूब भरली आहे. काही ठिकाणी भात खाचरे भरून वाहत असल्याने अनेक ठिकाणी भात लागवडीसाठी हा पाऊस पोषक ठरत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी भात लागवडींना सुरुवात केली आहे. शेताशेतात मजुरांसह कुटुंबातील व्यक्ती लागवडी करीत आहेत. पूर्व भागातील शिरूर, दौंड, इंदापूर, पुरंदर, बारामती या भागांत हलक्या सरी बरसत आहेत. मात्र, हा पाऊस सोयाबीन, कापूस, बाजरी, तूर, मूग उडीद अशा पिकांना पोषक ठरत आहेत.

Rain Update
Heavy Rain: मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांत सर्वदूर पाऊस

जिल्ह्यात अनेक ठिकाणी सकाळपासून संततधार सुरू असल्याने नागरिकांना घराबाहेर पडणे अशक्य होत आहे. त्यात मुळशी, भोर, वेल्हा, खेड, जुन्नर भागांत पावसाचा अधिक जोर आहे. राजूरनंतर जुन्नरमधील डिंगोरे येथेही १२५.० मिलिमीटर पाऊस पडला. मावळमधील काले येथे ११७.०, लोणावळा १०५.०, शिवणे १०९.० मुळशीतील माले १०३.० मिलिमीटर पाऊस पडला. तर, हवेलीतील थेऊर, उरुळीकांचन, हडपसर, वाघोली, शिरूरमधील तळेगाव, टाकळी, वडगाव, बारामतीतील बारामती, माळेगाव, पणदरे, लोणी, सुपा, मोरगाव, इंदापुरातील भिगवण, इंदापूर, लोणी, काटी, निमगाव, अंथुर्णे, सणसर, दौंडमधील देऊळगाव, पाटस, यवत, कडेगाव, वरवंड, रावणगाव, सासवडमधील कुंभारवळण, जेजुरी, राजेवाडी या भागांत पावसाच्या तुरळक सरी पडल्या. तर, बारामतीतील उंडवडी, इंदापुरातील बावडा या भागात ढगाळ वातावरण होते.

पुणे जिल्ह्यात सोमवारी (ता.११) सकाळी आठ वाजेपर्यंत मंडळनिहाय पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये :

- हवेली - पुणे वेधशाळा २२.१०, केशवनगर ११.०, कोथरूड १९.०, खडकवासला १८.०, खेड २३.०, भोसरी ५६.०, चिंचवड ३८.०, कळस १५.०,

- मुळशी - पौड ६०.०, घोटावडे ७०.०, थेरगाव ३५.०, मुठे ७५.०, पिरंगुट ३२.०

- भोर - भोर ५५.०, भोलावडे ५१.०, नसरापूर ४१.०, किकवी २२.०, वेळू ४३.०, आंबवडे ४२.०, संगमनेर ५२.०, निगुडघर ४६.०

- मावळ - वडगाव मावळ ७५.०, तळेगाव ७०.०, कार्ला ९७.०, खडकाळा ९१.०,

- वेल्हा ःवेल्हा ८९.०, पानशेत ९६.०, विंझर ८५.०, आंबवणे ५९

- जुन्नर ः जुन्नर ४८.०, नारायणगाव २०.०, वडगाव आनंद १२.०, निमगाव सावा १६.०, बेल्हा १७.०, आपटाळे ५८.०, ओतूर २८.०

खेड ः वाडा ६९.०, राजगुरुनगर १७.०, कुडे ५६.०, पाईट ७५.०, चाकण ३५.०, आळंदी २०.०, पिंपळगाव १५.०, कन्हेरसर २५.०, कडुस ७०.०

आंबेगाव - घोडेगाव २५.०, आंबेगाव ४२.०, कळंब ३६.०, पारगाव ११.०, मंचर ४१.०

शिरूर - न्हावरा १२.०, मलठण १३.०, रांजणगाव १७.०, कोरेगाव ११.०, पाबळ १३.०, शिरूर १३.०

बारामती - वडगाव १०.०, दौंड - राहू १०.०, दौंड १०.०

पुरंदर - सासवड १५.०, भिवंडी १९.०, परिंचे १०.०, वाल्हा १०.०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com