Pune Dam : पुणे जिल्ह्यातील धरणांत २०२ टीएमसी पाणीसाठा

परतीच्या पावसाचा जोर ओसरला असला तरी धरणांत पाण्याची अजूनही आवक सुरू आहे. पुणे जिल्ह्यातील धरणांत २०२.६७ टीएमसी एवढा पाणीसाठा झाला आहे.
Pune Dam
Pune Dam Agrowon

पुणे : परतीच्या पावसाचा जोर (Rainfall) ओसरला असला तरी धरणांत पाण्याची अजूनही आवक सुरू आहे. पुणे जिल्ह्यातील धरणांत २०२.६७ टीएमसी एवढा पाणीसाठा झाला आहे. ऑगस्ट महिन्यापासून टप्प्याटप्प्याने सोडण्यात आलेल्या अनेक धरणांतील पाण्याच्या विसर्गात हळूहळू घट केली जात आहे. धरणांतील पाणीसाठ्यामुळे आगामी काळातील शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न काही प्रमाणात सुटण्यास मदत झाली आहे.

Pune Dam
PDCC Bank Pune : ‘पीडीसीसी’ बँकेला ६८ कोटींचा नफा

यंदा हवामान विभागाने चालू वर्षी पहिल्या टप्प्यात ९९ टक्के, तर दुसऱ्या टप्यात १०३ टक्के पावसाचा अंदाज वर्तविला होता. त्यानुसार जून महिन्यात सरासरीच्या १७६.२ मिलिमीटरपैकी ८३.१ मिलिमीटर म्हणजेच ४७ टक्के पाऊस पडला आहे. सरासरीच्या तुलनेत जूनमध्ये अत्यंत कमी पाऊस पडल्याची नोंद आहे. तर जुलै महिन्यात सरासरीच्या ३०९.३ मिलिमीटरपैकी ४३७.५ मिलिमीटर म्हणजेच १४१ टक्के पाऊस पडला. सरासरीच्या तुलनेत ४१ टक्के अधिक पाऊस पडल्याची स्थिती आहे. ऑगस्ट, सप्टेंबरमध्येही सुरुवातीपासून चांगल्या पावसाने हजेरी लावली.

जिल्ह्यातील २६ धरणांतील उपयुक्त पाणीसाठ्याची क्षमता १९८.३४ टीएमसी एवढी आहे. त्यापैकी धरणांत २०२.६७ टीएमसी म्हणजेच १०२ टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यातच परतीच्या पावसानेही चांगलीच दाणादाण उडवल्याने धरणांतील पाणीपातळीत पुन्हा काही प्रमाणात वाढ झाली आहे. मुठा खोऱ्यातील टेमघर, खडकवासला या धरणांतील पाणीसाठा कमी-अधिक असून, वरसगाव, पानशेत ही धरणे शंभर टक्के भरलेली आहेत.

नीरा खोऱ्यातील पवना, कासारसाई, वडिवळे वगळता कळमोडी, चासकमान, भामा आसखेड, आंध्रा, शेटफळ, नाझरे, गुंजवणी, भाटघर, नीरा देवघर, वीर ही धरणे शंभर टक्के भरली आहेत. कुकडी खोऱ्यातील पिंपळगाव जोगे, माणिकडोह वगळता येडगाव, वडज, डिंभे, चिल्हेवाडी, घोड ही धरणेसुद्धा शंभर टक्के भरली आहेत. मुळशी, विसापूर या धरणांत शंभर टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा असून, उजनी धरणांत शंभर टक्क्यांहून अधिक म्हणजेच १११ टक्के पाणीसाठा झाला आहे.

धरणनिहाय उपयुक्त झालेला पाणीसाठा, टीएमसीमध्ये :

टेमघर ३.६२, वरसगाव १२.८२, पानशेत १०.६५, खडकवासला १.६६, पवना ८.२९, कासारसाई ०.५६, कळमोडी १.५१, चासकमान ७.५८, भामा आसखेड ७.६७, आंध्रा २.९२, वडिवळे १.०६, शेटफळ ०.६२, नाझरे ०.५९, गुंजवणी ३.६९, भाटघर २३.५१, नीरा देवघर ११.७३, वीर ९.४१, पिंपळगाव जोगे ३.५६, माणिकडोह ९.३९, येडगाव १.९४, वडज १.१७, डिंभे १२.५०, चिल्हेवाडी ०.८०, घोड ४.८७, विसापूर ०.९०, मुळा १८.१३, उजनी ५९.६३.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com