Rain Update : लोणावळ्यात २१३ मिलिमीटर पाऊस

पूर्वेकडील शिरूर तालुक्यात १० मिलिमीटर, पुरंदरमध्ये नऊ मिलिमीटर बारामतीमध्ये दोन, इंदापूरमध्ये चार, दौंडमध्ये दोन मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
Rain Update
Rain Update Agrowon

पुणे : जिल्ह्यातील बहुतांशी भागात पावसाचा जोर (Rain Force In Pune District) वाढत आहे. बुधवारी (ता.१३) सकाळी आठ वाजेपर्यंत लोणावळा येथे उच्चांकी २१३ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. त्यामुळे भात खाचरे (Paddy Farming) भरून वाहू लागली आहेत.

पश्‍चिम पट्ट्यात मुसळधार पाऊस (Heavy Rain) पडत असून, जवळपास पंधरा दिवस होत आले आहेत. मुळशी तालुक्यात सर्वाधिक १२३ मिलिमीटर, मावळ तालुक्यात ११९ मिलिमीटर पाऊस पडला. तर, वेल्ह्यात ७९ मिलिमीटर, जुन्नर ४१, पुणे शहरात ३८, आंबेगाव तालुक्यात ३३, खेडमध्ये ३०, हवेलीत २६ मिलिमीटर पाऊस पडला.

Rain Update
Weather Updates: घाटमाथ्यावर दमदार पाऊस,धरणसाठ्यात होणार वाढ

पूर्वेकडील शिरूर तालुक्यात १० मिलिमीटर, पुरंदरमध्ये नऊ मिलिमीटर बारामतीमध्ये दोन, इंदापूरमध्ये चार, दौंडमध्ये दोन मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. बुधवारी (ता. १३) सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू झाली होती, ती दुपारपर्यंत सुरूच होती. दुपारनंतर काही प्रमाणात संततधार कमी झाल्याने पावसाची अधूनमधून उघडीप होती.

मुळशीतील माले येथे १९८ अतिवृष्टीसदृश पाऊस कोसळत आहे. तर, घोटावडे येथे १८०, जुन्नरमधील राजूर येथे १८५, मावळमधील कार्ला येथे १७७ मिलिमीटर पाऊस पडला. या पावसामुळे धरणाच्या पाणीपातळीत वेगाने वाढ होत आहे. पश्‍चिम पट्ट्यात मुसळधार पावसाचा जोर कायम असला तरी पूर्व भागात पाऊस कमी आहे. हवेलीच्या पूर्व भागात थेऊर, उरुळीकांचन या भागांत हलका पाऊस पडला. खेडमधील पिंपळगाव, आंबेगावमधील पारगाव, शिरूरमधील टाकळी, वडगाव, न्हावरा, मलठण, बारामतीतील माळेगाव, पणदरे, वडगाव, लोणी, सुपा, मोरगाव, उंडवडी, इंदापुरातील भिगवण, लोणी, बावडा, काटी, निमगाव, अंथुर्णे, सणसर, दौंडमधील देऊळगाव, पाटस, यवत, कडेगाव, राहू, वरवंड, रावणगाव, दौंड, पुरंदरमधील कुंभारवळण, राजेवाडी, वाल्हा या भागांत पावसाच्या तुरळक सरी पडल्या.

पुणे जिल्ह्यात मंडळनिहाय पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये :

हवेली - पुणे शहर ४९, केशवनगर २७, कोथरूड ४३, खडकवासला ३८, खेड ३८, भोसरी ३३, चिंचवड ३६, कळस १७, हडपसर ३७, वाघोली १४.

मुळशी - पौड १००, थेरगाव ४७, मुठा १६०, पिरंगुट ५४.

भोर - भोर ३१, भोलावडे ४२, नसरापूर २३, किकवी २२, वेळू ३३, आंबवडे ४६, संगमनेर ७७, निगुडघर ७१.

मावळ - वडगाव मावळ ५३, तळेगाव २३, काळे १४९, खडकाळा ९०, शिवणे १३०.

वेल्हा - वेल्हा ९१, पानशेत ९३, विंझर ८५, आंबवणे ४७.

जुन्नर - जुन्नर २२, नारायणगाव १३, वडगाव आनंद १२, निमगाव सावा १३, बेल्हा १५, डिंगोरे ६५, आपटाळे ४२, ओतूर १०.

खेड - वाडा ३७, राजगुरुनगर ३०, कुडे ४९, पाईट ५२, चाकण २६, आळंदी १३, कन्हेरसर २४, कडुस ३७.

आंबेगाव - घोडेगाव ४०, आंबेगाव ४१, कळंब ३३, मंचर ४६.

शिरूर - तळेगाव १४, रांजणगाव १३, कोरेगाव १०, पाबळ १४, शिरूर १५.

इंदापूर - इंदापूर २२.

पुरंदर - सासवड १७, भिवंडी १५, जेजुरी १०, परिंचे ११.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com