Pulses Production : अमरावती जिल्ह्यात प्रति हेक्टरी मूग २२, उडीद ३१ किलो उत्पादन

दरवर्षी बदलणाऱ्या हवामानामुळे या दोन्ही पिकांवर प्रतिकूल परिणाम होत असून, उत्पादन घटून उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे.
Moong Market
Moong MarketAgrowon

अमरावती : जिल्ह्यातील यावर्षीच्या खरीप हंगामात (Kharif Season) मुगाच्या उत्पादनाची (Moong Production) सरासरी हेक्टरी २२, तर उडदाची ३१ किलो आली आहे. दोन्ही पिके बुडाल्यात जमा झाली असून, गेल्या दशकात या दोन्ही पिकांचे पेरणीक्षेत्र कमी होऊ लागले आहे. दरवर्षी बदलणाऱ्या हवामानामुळे (Climate Change) या दोन्ही पिकांवर प्रतिकूल परिणाम होत असून, उत्पादन घटून उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे.

Moong Market
Pulses Cultivation : माणगावमध्ये कडधान्याच्या शेतीला बहर

जिल्ह्यात मूग व उडदाची पेरणी फार कमी क्षेत्रात आहे. गेल्या दशकभरात या दोन्ही पिकांच्या पेरणीक्षेत्रात झपाट्याने घट आली आहे. पूर्वी जिल्हाभरात आंतरपीक म्हणून मूग व उडदाची पेरणी केली जात होती. आता ती खारपाणपट्ट्यातील भातकुली, दर्यापूर या तालुक्यांसह मोजक्या चार ते पाच तालुक्यात पेरणी आहे.

Moong Market
Pulses Sowing : कोवाड भागांत कडधान्य क्षेत्र वाढण्याची शक्यता

यावर्षी ७,७३९ हेक्टर क्षेत्रात मुगाची, तर १९०६ हेक्टर क्षेत्रात उडदाची पेरणी करण्यात आली होती. सर्वांत कमी दिवसांचे पीक, अशी या दोन्ही पिकांची ओळख आहे. पोळ्याच्या आसपास त्यांचे उत्पादन शेतकऱ्यांच्या घरात येते.

यंदा मात्र जुलै व ऑगस्टमधील पावसाचा या पिकांवर प्रतिकूल परिणाम झाला असून त्यांची उत्पादनाची सरासरी घसरली. पीक काढणी प्रयोगानुसार मुगाची २२ किलो प्रति हेक्टर सरासरी आली आहे, तर उडदाची सरासरी ३१ किलो ५२ ग्रॅम प्रति हेक्टर आली आहे. दोन्ही पिकांपासून उत्पादनाच्या सरासरीमुळे शेतकरी निराश झाला आहे. काही ठिकाणी पीक न आल्याने तेथील शेतकऱ्यांनी वखरणी करून पीक मोडले आहे.

हवामान बदलाचा परिणाम

दरवर्षी हवामानात बदल होत आहे. ऐन काढणीच्या वेळेस पाऊस येत असल्याने दोन्ही पिकांचे नुकसान होते. अपेक्षित उत्पादन मिळत नाही. पेरणी व नंतर लागणारा खर्चही निघत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी या पिकांना आता फाटा दिला आहे.

- अनिल खर्चान, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com