राज्यातील धरणांत २२ टक्के पाणीसाठा

गेल्या वर्षीच्या तुलनेत तीन टक्क्यांनी कमी पाणी
Water Storage
Water StorageAgrowon

पुणे ः मे, जून महिन्यांत पाण्याची मागणी (Water Demand) वाढल्याने धरणांतील पाणीसाठा (Water Storage In Dam) झपाट्याने कमी झाला आहे. राज्यात २१ जूनपर्यंत एकूण तीन हजार २६७ प्रकल्पांमध्ये सुमारे ३१७ टीएमसी (९००७.०९ दशलक्ष घनमीटर) एवढा म्हणजेच सरासरी २२.०९ टक्के पाणीसाठा (Water Stock) आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळपास तीन टक्क्यांनी पाणी कमी आहे. गेल्या वर्षी याच काळात २५.३५ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. येत्या काळात जोरदार पाऊस झाल्यास धरणात नवीन पाण्याची आवक सुरू होईल.

राज्यात दरवर्षी मे महिन्यात तीव्र पाण्याची टंचाई भासते. त्यामुळे पाण्यासाठी शासनाला अनेक ठिकाणी टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागतो. चालू वर्षीही काही प्रमाणात राज्यात सुमारे ५२७ टॅंकर्सनी पाणीपुरवठा सुरू आहे. मात्र, गेल्या वर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे राज्यातील प्रकल्पांमध्ये चांगले पाणी आले होते. तसेच भूजल पातळीत वाढ होऊन विहिरींना आणि बोअरवेलला चांगले पाणी आले. मात्र काही भागांत पाण्याचा अति उपसा होत असल्यामुळे फेब्रुवारीपासून अनेक गावामध्ये पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या. त्यामुळे काही गावांमध्ये टॅंकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला.

गेल्या वर्षी मे, जूनमध्ये कोरोनामुळे पाण्याची मागणी कमी होती. यंदा पाण्याची अधिक मागणी वाढली होती. त्यामुळे धरणांतील पाण्याचे वेगाने बाष्पीभवन व पाण्याची मागणी वाढल्याने धरणातील पाणीसाठा वेगाने कमी झाला आहे.

पुणे विभागात सर्वाधिक पाणी

सध्या मोठ्या, मध्यम आणि लहान प्रकल्पांत सर्वाधिक ७०.६० टीएमसी म्हणजेच १३.१५ टक्के पाणीसाठा आहे. यामध्ये मोठ्या ३५ धरणांत ५६.०२ टीएमसी म्हणजेच १२ टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी या धरणांत २५ टक्के पाणीसाठा होता. मध्यम ५० धरणांत ९.०१ टीएमसी म्हणजेच १८ टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी या धरणांत २५ टक्के पाणीसाठा होता. सध्या पुणे विभागापाठोपाठ कोकण विभागात ४३.५१ टीएमसी (३५.११ टक्के), अमरावती विभागात ४७.३० टीएमसी (३२.८९ टक्के), नागपूर विभागात ४२.८० टीएमसी (२६.३२ टक्के), नाशिक विभागात ४४.३६ टीएमसी (२०.९३ टक्के), तर औरंगाबाद विभागात ६९.३८ टीएमसी (२६.६६ टक्के) पाणीसाठा आहे.

प्रकल्पनिहाय पाणीसाठा (टीएमसीमध्ये) :

प्रकल्प ---संख्या ---पाणीसाठा---टक्के

मोठे प्रकल्प ---१४१ ---२५१.२६ --- २४.५६

मध्यम प्रकल्प ---२५८ --- ४२.९३ ---२२.४७

लघू प्रकल्प --- २८६८ ---२३.७९ --- १०.५४

एकूण--- ३,२६७ ---३१७.९९ --- २२.०९

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com