
कोल्हापूर : जिल्ह्यात सुरू असलेल्या ४७४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत (Gram Panchayat Election) ४१ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याचे स्पष्ट झाले. त्याशिवाय, २३ सरपंच तसेच ४९१ हून अधिक सदस्यांनीही बिनविरोध होण्याचा मान मिळविला. अर्ज माघारीच्या दिवशी निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले. त्यामुळे एकीकडे गावागावांत इर्ष्येचे राजकारण (Politics) पेटणार असले, तरी दुसरीकडे बिनविरोध झाल्याचा आनंदोत्सव साजरा केला जात आहे.
Elect
अर्ज माघारीनंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ग्रामपंचायत विभागाकडून रात्री बारापर्यंत आकड्यांची जुळवाजुळव केली जात होती. प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्याने डोळ्यांत तेल घालून काम करावे लागत असल्याचे चित्र आहे. ग्रामपंचायतींसाठी १८ डिसेंबरला मतदान आणि २० डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.
जिल्ह्यातील ४७४ ग्रामपंचायतींमधील एक हजार ६५० प्रभागांत निवडणूक होत आहे. यात ४७४ सरपंच आणि चार हजार ४०२ सदस्य निवडून द्यायचे आहेत. यापैकी आज अर्ज माघारीच्या दिवशी ४१ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याचे स्पष्ट झाले.
ग्रामपंचायतींमधील चार हजार ४०२ पैकी ४९१ सदस्य आणि ४७४ सरपंचपदांपैकी संपूर्ण ग्रामपंचायतींची बिनविरोध निवड वगळता इतर ग्रामपंचायतींमधील २३ सरपंचांची निवड बिनविरोध झाली. जिल्ह्यात सरपंचपदासाठीच्या एक हजार ४५६ उमेदवारांनी बुधवारी (ता. ७) एक हजार ४६२ अर्ज मागे घेतले.
त्यामुळे उर्वरित सरपंचपदांसाठी आता एक हजार १९३ उमेदवारांचे एक हजार २२४ अर्ज शिल्लक राहिले आहेत. ग्रामपंचायत सदस्यपदासाठीच्या सात हजार ३६२ उमेदवारांनी सात हजार ४४२ अर्ज मागे घेतले. तर, आठ हजार ९९५ उमेदवारांचे नऊ हजार ८३ अर्ज शिल्लक राहिले आहेत. हे सदस्य विविध प्रभागांतून निवडणूक लढवत आहेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.