मेळघाटातील २४ गावे उजळणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन

आमदार राजकुमार पटेल यांच्या प्रयत्नाने या गावांत आता वीज पोहोचणार आहे.
देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीसAgrowon

चिखलदरा, अमरावती : मेळघाटातील (Melghat) धारणी व चिखलदरा तालुक्यांतील २४ गावांमध्ये स्वातंत्र्यापासून अजूनही वीज पोहोचली नव्हती. या भागातील आदिवासी बांधव ७५ वर्षे काळोखातच होते. मात्र आमदार राजकुमार पटेल (Rajkumar Patel) यांच्या प्रयत्नाने या गावांत आता वीज पोहोचणार आहे. याबाबत उपमुख्यमंत्री यांनी मेळघाटातील वीजसमस्या तातडीने निकाली काढणार असल्याचे आश्वासन आमदार पटेल यांना दिले.

देवेंद्र फडणवीस
ओबीसींना दिलेला शब्द कायम : देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमरावती येथील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला आले होते. यादरम्यान आमदार राजकुमार पटेल यांनी देवेंद्र फडणवीस यांना भेटून संबंधित समस्येचे निवेदन दिले आहे. या २४ गावांचा प्रस्ताव शासनाकडे पडून असून काम अतिशय संथगतीने सुरू असल्याचे आमदार पटेल यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात आणून दिले. वीज नसलेल्या २४ गावांमध्ये माखला, भवई, पिपल्या, खामदा, नवलगाव, मारिता, टेम्बरू, किनी खेडा, रायपूर, चोपन, रिटायखेडा, कोपमार, सावलीखेडा, रक्षा, चूणखडी, कुंड, माडी झडप, रंगूबेली, खडीमल, सुमीता, बोराट्या खेडा, धोकडा, बिच्छू खेडा व खुटीदा इत्यादी गावांचा समावेश आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन चर्चा केली. त्यांना मेळघाटातील या २४ गावांमध्ये वीज नसल्याचे सांगण्यात आले. या २४ गावांच्या विजेच्या कामात सर्वांत मोठा अडथळा वनविभागाचा आहे. मात्र प्रशासनाने तत्काळ वनविभागाची परवानगी घेतली तर काम लवकरच सुरू होईल, असेही सुचविण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com