Water Conservation Scheme | Pazar Talav Repairing
Water Conservation Scheme | Pazar Talav RepairingAgrowon

Water Conservation Scheme : पाझर तलावांच्या दुरुस्तीसाठी अडीच कोटी

राज्य शासनाने मुख्यमंत्री जलसंधारण योजनेतून शहादा तालुक्यातील पाझर तलावांच्या दुरुस्तीसाठी दोन कोटी ४० लाख रुपयांचा निधी मंजूर केला असून, तालुक्यातील चार पाझर तलावांच्या दुरुस्तीच्या कामांचे भूमिपूजन आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते नुकतेच झाले.

शहादा, जि. नंदुरबार : राज्य शासनाने मुख्यमंत्री जलसंधारण योजनेतून (Water Conservation Scheme) शहादा तालुक्यातील पाझर तलावांच्या दुरुस्तीसाठी (Pazar Talav Repairing) दोन कोटी ४० लाख रुपयांचा निधी मंजूर केला असून, तालुक्यातील चार पाझर तलावांच्या दुरुस्तीच्या कामांचे भूमिपूजन आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते नुकतेच झाले.

Water Conservation Scheme | Pazar Talav Repairing
Rabi Irrigation : कुकडी प्रकल्पातून रब्बीचे आवर्तन सुरू करण्याची मागणी

तालुक्यातील पाझर तलावांची दुरवस्था झाल्याने हे तलाव कुचकामी ठरले होते. पावसाळ्यात येथे पाणी अडविण्यात व साठविण्यात यश येत असले, तरी ठिकठिकाणी तलाव फुटल्यामुळे पाणी वाहून जात होते.

Water Conservation Scheme | Pazar Talav Repairing
Takari Irrigation Scheme : ‘ताकारी’चा मुख्य कालवा वाहू लागला

परिणामी, पावसाळ्यानंतर या तलावांचा कुठलाही उपयोग परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी, तर ग्रामपंचायतींना पिण्याच्या पाण्यासाठी होत नव्हता. परिणामी, तलावाची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी अनेक वर्षांपासून तालुक्यातील नागरिकांनी केली होती.

शेतकरी व नागरिकांच्या या मागणीची दखल घेत आमदार राजेश पाडवी यांनी दोन वर्षांपासून शहादा तालुक्यातील पाझर तलावांच्या दुरुस्तीसाठी शासनाने तत्काळ निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करत वेळोवेळी पाठपुरावा केला होता.

आमदार पाडवी यांच्या पाठपुराव्याला यश आले असून, राज्य शासनाने मुख्यमंत्री जलसंधारण योजनेअंतर्गत शहादा तालुक्यासाठी दोन कोटी ४० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या वेळी भाजप तालुका कार्याध्यक्ष डॉ. किशोर पाटील, शहराध्यक्ष विनोद जैन, भाजप दिनेश खंडेलवाल, योगेश पावरा, प्रवीण वाळवी, सरपंच अमित पाडवी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com