Gharkul Yojana : शिरूरमध्ये ९२३ घरकुलांना अडीच लाखांचा निधी मंजूर

केंदूर येथे सर्वाधिक १२० कुटुंबांना मिळाला लाभ
 Gharkul Yojana
Gharkul YojanaAgrowon

शिक्रापूर, जि. पुणे ः पंतप्रधान घरकुल योजनेअंतर्गत (Gharkul Yojana) शिरूर तालुक्यातील ९२३ घरकुलांना प्रत्येकी अडीच लाख रुपये पीएमआरडीएने मंजूर केल्याची माहिती पीएमआरडीएचे सदस्य प्रकाश आबासाहेब गव्हाणे यांनी दिली. दरम्यान, केंदूर येथे सर्वाधिक १२० कुटुंबांना लाभ जाहीर झाल्याची माहिती केंदूरचे सरपंच सूर्यकांत थिटे व उपसरपंच विठ्ठल ताथवडे यांनी दिली.

 Gharkul Yojana
Gharkul Yojana : नोंदणीकृत कामगारांना घरकुल देणार

पंतप्रधान घरकुल योजनेसाठी पुणे ग्रामीणमध्ये घरकुलांसाठी पीएमआरडीए निधी उपलब्ध करून देते. त्यानुसार यावर्षीची मंजूर घरकुलांची यादी पीएमआरडीएकडून जाहीर करण्यात आली असून त्यात शिरूरसाठी ९२३ कुटुंबांसाठी प्रत्येकी अडीच लाख रुपये मंजूर झाले आहेत.
दरम्यान, केंदूरला १२० कुंटुंबाखालोखाल न्हावरा (९२), कान्हूर-मेसाई (८९), शिक्रापूर (७८), मलठण (६५) आणि मिडगुलवाडी (४६) अशा क्रमाने एकूण ४८ गावांना या योजनेचा लाभ मिळाल्याची माहिती यावेळी श्री गव्हाणे यांनी दिली.

 Gharkul Yojana
शिरोळमधील क्षारपड जमिनीच्या सर्वेक्षणासाठी ६० लाखांचा निधी मंजूर

गावनिहाय घरकुल योजनांची यादी (कंसात मंजूर घरकुलांची संख्या) :
केंदूर (१२०), न्हावरा (९२ घरकुले), कान्हूर मेसाई (८९), शिक्रापूर (७८), मलठण (६५ ), आमदाबाद (४९), मिडगुलवाडी व अण्णापूर (४६), धामारी (३३), दहिवडी (३१), पिंपळे-जगताप (३०), धानोरे व निमगाव भोगी (२६), कासारी (२३), हिवरे व जातेगाव बुद्रुक (प्रत्येकी १९), जातेगाव खुर्द (१६) पारोडी (१५), डिंग्रजवाडी, दरेकरवाडी व करंजावणे (प्रत्येकी ११), डिंग्रजवाडी (११) करंदी व निमगाव-म्हाळुंगी (प्रत्येकी १०), शिंगाडवाडी पिंपरी-दुमाला (प्रत्येकी ५), खैरेवाडी (९), भांभार्डे, बुरुंजवाडी व चिंचोली (प्रत्येकी ४), गणेगाव खालसा व आरणगाव (प्रत्येकी ३), कोरेगाव-भीमा, राऊतवाडी, मुखई व कोंढापुरी (प्रत्येकी २), लाखेवाडी, नागरगाव व पाबळ (प्रत्येकी १).

आयुक्त आणि सर्व वरिष्ठ अधिकारी सतर्क : किशोर हटकरे
अगदी गरीब व सामान्य कुटुंबांच्या घरांसाठी ही योजना असल्याने पीएमआरडीएचे आयुक्त राहुल महिवाल, क्षेत्रिय अभियंता संतोष तावरे, जिल्हा समन्वयक एस. व्ही. सावंत व सर्वच वरिष्ठ-कनिष्ठ अधिकारी सतर्क होते. त्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येने घरकुल अनुदान मंजूर झाल्याची माहिती शिरूर तालुका योजना समन्वय किशोर हटकरे यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com