Shed Net Damage : सिंदखेडराजा तालुक्यात २५ शेडनेटचे नुकसान

दोन दिवसांपूर्वी सिंदखेडराजा तालुक्यातील नशिराबाद शिवारात बीजोत्पादकांच्या २५ शेडनेटचे नुकसान झाले आहे. या आपत्तीमुळे बीजोत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे.
Heavy Rain
Heavy RainAgrowon

बुलडाणा ः दोन दिवसांपूर्वी सिंदखेडराजा तालुक्यातील नशिराबाद शिवारात बीजोत्पादकांच्या (Seed Producer) २५ शेडनेटचे नुकसान (Damage To Shednet) झाले आहे. या आपत्तीमुळे बीजोत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. या नुकसानग्रस्त भागाची आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी पाहणी करून तत्काळ नुकसान अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

सिंदखेडराजा तालुक्यातील नशिराबाद शिवारामध्ये बुधवारी (ता. ३१) रात्री प्रचंड वादळ वाऱ्यासह पाऊस पडला. यात २५ शेडनेट उद्ध्वस्त झाल्या. अनेक शेतकऱ्यांचे तयार बीजही भिजले. डॉ. शिंगणे यांच्यासह तहसीलदार सुनील सावंत, तालुका कृषी अधिकारी वसंत राठोड आदींनी नुकसानीची पाहणी केली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com