MPKV Rahuri News : ‘जॉइंट ॲग्रेस्को’मध्ये मांडल्या मंजुरीसाठी २६७ शिफारशी

Joint Agresco : महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक गोरंटीवार यांनी विद्यापीठाच्या कामाचे सादरीकरण केले.
Joint Aggresco
Joint Aggresco Agrowon

Nagar News : राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात सुरू झालेल्या ५१ व्या संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समितीच्या (जॉइंट अॅग्रेस्को) बैठकीत पहिल्या सत्रात राज्यातील चारही कृषी विद्यापीठांसह नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, कृषी विभागाने कामाचा आढावा गुरुवारी (ता. २५) मांडत सादरीकरण केले. या वेळी वाण, अवजारे व तंत्रज्ञान मिळून २६७ शिफरशी मान्यतेसाठी ठेवण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

महात्मा फुले कृषी विद्यापीठात गुरुवार (ता. २५)पासून शनिवार (ता. २७)पर्यंत ही बैठक होत आहे. सकाळी अकरा वाजता बैठकीला सुरुवात झाल्यानंतर नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे संचालक परिमल सिंग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पहिल्या सत्रातील कार्यक्रमाला महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्रमणी, ‘महाबीज’चे कार्यकारी संचालक सचिन कलंत्री यांची उपस्थिती होती.

महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक गोरंटीवार यांनी विद्यापीठाच्या कामाचे सादरीकरण केले. १० जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या विद्यापीठाचे ४ हजार ६२९ हेक्टर क्षेत्रावर संशोधन व अन्य बाबी सुरू आहेत.

२५ संशोधन केंद्रातून काम सुरू असून, यंदा भाताचे फुले कोलम, फुले सुपर पवना, मकाचे फुले उमेद व चॅम्पियन व ऊस असे पाच वाण, सहा पूर्वप्रसारित वाण व तीन प्रसारित यंत्रे आणि शिफारशी केल्या आहेत.

Joint Aggresco
Kharif Sowing In Nagar : खरिपासाठी साडेसहा लाख हेक्टर प्रस्तावीत

अकोला विद्यीपाठाचे संशोधन संचालक विलास खर्चे यांनी मका, राळा, सूर्यफूल, लसूण, कवठ, नवीन हरभरा, उन्हाळी मूग, धान, मोहरी, करडई, वरई आदी नवे व पूर्वप्रसारित वाण, ५ यंत्रे व ७५ शिफारशी केल्या आहेत.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर यांनी ८ जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या या विद्यापीठाने ६ वाण, ५ यंत्रे, ४६ शिफारशी केल्या असून, त्यात प्रामुख्याने शेतकऱ्यांना फायदेशीर व कमी कष्ट, कमी कालावधी व तग धरणारे कापूस, हरभरा, तीळ, ज्वारी, मिरची, टोमॅटो वाणाचा समावेश आहे.

Joint Aggresco
MPKV Rahuri : संयुक्त कृषी संशोधन, विकास समितीची उद्यापासून बैठक

दापोली कृषी विद्यापीठाने भाताचे चार वाण, ३७ शिफारशी केल्याचे सांगितले. तीन दिवस या बाबीवर मंथन होऊन मान्यता देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. संशोधन परिषदेचे हरिहर कौसडीकर यांनी चार विद्यापीठाने आतापर्यंत केलेले संशोधन व इतर बाबीचे सादरीकरण केले. पोकरा, तसेच कृषी विभागाच्या योजनांचीही या वेळी माहिती देण्यात आली.

विकसित वाण, यंत्रांचे प्रदर्शन

राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील ५१ व्या संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समितीच्या (जॉइंट अॅग्रेस्को) बैठकीसाठी राज्यभरातून संशोधन, शास्त्रज्ञ आलेले आहे. जे वाण, यंत्रे विकसित केली व ती मान्यतेसाठी बैठकीत मांडली आहे, त्याचे सादरीकरण होणार आहे. त्याची प्रदर्शन भरवण्यात आले आहे. प्रदर्शन पाहण्यासाठीही अधिकारी, कर्मचारी, शास्त्रज्ञांची गर्दी होत आहे. यंत्रे, अवजारे, वाणांची माहिती घेतली जात आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com