Z.P. School : ठाण्यातील २८७ शाळा बंद होणार?

ग्रामीण भागातील साडेचार हजार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले असून, अतिदुर्गम आदिवासी व ग्रामीण भागातील या शाळा बंद झाल्यास आमच्या लेकरांनी शिकायचे कुठे, असा प्रश्न पालकांपुढे आहे.
Z.P. School
Z.P. SchoolAgrowon

टिटवाळा : राज्य सरकारने २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या (Z.P. School Thane) २८७ शाळांना टाळे लागण्याची शक्यता आहे.

Z.P. School
ZP School: खेड्यांतल्या पोरांच्या शिक्षणाचं काय होणार?

ग्रामीण भागातील साडेचार हजार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले असून, अतिदुर्गम आदिवासी व ग्रामीण भागातील या शाळा बंद झाल्यास आमच्या लेकरांनी शिकायचे कुठे, असा प्रश्न पालकांपुढे आहे.

महापालिका हद्दीतील शाळा जिल्हा परिषदेमार्फत चालविल्‍या जातात. आपल्या हद्दीतील शाळा बंद होत असताना ठाणे जिल्हा परिषद प्रशासन व पदाधिकारी मात्र मूग गिळून आहेत.

कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील २७ गावांतील ३५ हून अधिक प्राथमिक शाळा, अंबरनाथ व बदलापूरला नगरपालिका हद्दीत ६० हून अधिक प्राथमिक शाळा, मुरबाड व शहापूर नगरपंचायत हद्दीतील १० प्राथमिक शाळा, नवी मुंबई महापालिका हद्दीतील १३ प्राथमिक शाळा जिल्हा परिषद चालवत आहे आणि तेथील स्थानिक स्वराज्य संस्था मात्र बघ्याची भूमिका घेत आपली जबाबदारी टाळत आहेत.

ठाण्याच्या ग्रामीण भागातील कल्याण, मुरबाड, शहापूर व भिवंडी, अंबरनाथ या तालुक्यांतील वीस विद्यार्थी पटसंख्या असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतल्याने साडेचार हजार विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com