Nashik News: विजबिलांचे २८९ कोटी थकित

नाशिक परिमंडलात ५ ते १० वर्षात शेतीपंपाच्या देयकाची रक्कम न भरणाऱ्या कृषी ग्राहकांची संख्या ५ हजार ७८ इतकी आहे. या ग्राहकांकडे १६४ कोटी ११ लाख रुपये थकबाकी आहे.
Nashik News
Nashik NewsAgrowon

Nashik News : विविध योजना आखूनही ‘महावितरण’च्या (Mahavitaran) आवाहनास प्रतिसाद न देणाऱ्या पाच वर्षांपासून बिले थकविणाऱ्या आणि ज्या मंजूर जोडभार ७.५ अश्वशक्तीपेक्षा अधिक असलेल्या कृषी ग्राहकांच्या शेतीपंपाचा (Agricultural Pump) वीजपुरवठा (Power supply) खंडित करण्याची मोहीम कोकण प्रादेशिक विभागासह नाशिक परिमंडळात सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती ‘महावितरण’चे कोकण प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे यांनी दिली.

नाशिक परिमंडळात येणाऱ्या नाशिक (Nashik) आणि नगर (nagar) जिल्ह्यातील ८ हजार ३५६ शेतकऱ्यांकडे २८९ कोटी ३१ लाख ९१ हजार रुपये, थकबाकी आहे.

नाशिक परिमंडलात ५ ते १० वर्षात शेतीपंपाच्या देयकाची रक्कम न भरणाऱ्या कृषी ग्राहकांची संख्या ५ हजार ७८ इतकी आहे. या ग्राहकांकडे १६४ कोटी ११ लाख रुपये थकबाकी आहे.

१० ते १५ वर्षात शेतीपंपाच्या देयकाची रक्कम न भरणाऱ्या कृषी ग्राहकांची संख्या २ हजार ४३७ आहे. या ग्राहकांकडे ९० कोटी ८६ लाख रुपये थकबाकी आहे.

वीजपुरवठा खंडित करण्याची मोहिम सुरू

१५ वर्षापेक्षा जास्त कालावधीत शेतीपंपांच्या देयकाची रक्कम न भरणाऱ्या कृषी ग्राहकांची संख्या ८४१ असून, या ग्राहकांकडे ३४ कोटी ३३ लाख रुपये थकबाकी आहे.

त्यामध्ये७.५ ते १० अश्वशक्ती असणारे ६८० ग्राहक, १० ते २० अश्वशक्ती असणारे १४८ आणि २० अश्वशक्ती पेक्षा जास्त क्षमतेचा जोडभार मंजूर असणाऱ्यांची संख्या १३ आहे.

Nashik News
Agriculture Electricity : कृषिपंपांच्या वीजबिल थकबाकी वसुलीसाठी मोहीम

अशा एकूण नाशिक परिमंडलांत ५ ते १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीत शेतीपंपाच्या देयकाची रक्कम न भरणाऱ्या कृषी ग्राहकांची संख्या ८ हजार ३५६ आहे. या ग्राहकांकडे २८९ कोटी ३१ लाख रुपये थकबाकी आहे. यांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहिम सुरू आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com