Agriculture Department : केंद्र, राज्य पुरस्कृत योजनेअंतर्गत २९ कोटी २२ लाखांवर निधी खर्च

परभणी जिल्ह्यात २०२२-२३ या आर्थिक वर्षात केंद्र व राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण, कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रम, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान आदी योजनांतर्गत ६४ हजार ६६६ शेतकरी लाभार्थ्यानी लाभ घेतला आहे.
Agriculture Department
Agriculture DepartmentAgrowon

Parbhani News : परभणी जिल्ह्यात २०२२-२३ या आर्थिक वर्षात केंद्र व राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण, कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रम, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान आदी योजनांतर्गत ६४ हजार ६६६ शेतकरी लाभार्थ्यानी लाभ घेतला आहे. त्यावर २९ कोटी २२ लाख ९४ हजार रुपये निधी खर्च झाला आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत २०२२-२३ मध्ये केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत ६ कोटी ५५ लाख ३३ हजार अनुदान प्राप्त झाले होते. त्यातून १ हजार १८१ लाभार्थांना ६ कोटी ३४ लाख ३२ हजार रुपये निधी खर्च झाला. राज्य पुरस्कृत योजनेअंतर्गत ८ कोटी ७७ लाख ८५ हजार रुपये निधी प्राप्त झाला त्यातून १ हजार १६६ लाभार्थींना ६ कोटी ७४ लाख ३६ हजार रुपये अनुदान वितरित करण्यात आले.

Agriculture Department
Micro Irrigation Scheme : सूक्ष्म सिंचनासाठी ‘महाडीबीटी’वर केलेले अर्ज महिनोन् महिने पडून

राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत (आरकेव्हीवाय) ४ कोटी ४९ लाख ३९ हजार रुपये निधी प्राप्त झाला त्यातून ९०९ लाभार्थीना ४ कोटी ४४ लाख २० हजार रुपये अनुदान देण्यात आले.

राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत १५ लाख ९० हजार रुपये निधीतून ४० लाभार्थांना १२ लाख ४५ हजार रुपये अनुदान देण्यात आले. कीड-रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प (क्रॉपसॅप) अंतर्गत ३४ लाख १० हजार रुपये खर्च झाला.

Agriculture Department
PM Kusum Scheme : ‘कुसूम’मधील सौरपंपांच्या अर्जांसाठी शेतकऱ्यांची दमछाक

राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान कडधान्य, पौष्टिक तृणधान्य, गळितधान्य व तेलताड अंतर्गत ३ कोटी ८४ लाख २१ हजार रुपयांतून २८ हजार २७७ शेतकऱ्यांना ३ कोटी ८० लाख ९७ हजार रुपये निधी खर्च झाला.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान व्यापारी पिके अंतर्गत ऊस विकास कार्यक्रमात ७ लाख २५ लाख रुपये निधीतून २५१ लाभार्थांना ५ लाख २३ हजार रुपये तर कापूस विकास कार्यक्रमांतर्गत १२ लाख ८० हजार रुपये निधीतून १ हजार ५६० शेतकऱ्यांना ११ लाख ९० हजार रुपये निधी वितरित करण्यात आला.

राज्य पुरस्कृत सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकास विशेष कृती योजनेअंतर्गत प्राप्त ४ कोटी २९ लाख ५५ हजार निधीतून ७ हजार ३५ लाभार्थींना ४ कोटी १८ लाख ४१ हजार रुपये खर्च झाला, तर कापूस उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकास कृती योजनेअंतर्गत ३ कोटी १२ लाख ४० हजार रुपयांतून ४ हजार ५२४ लाभार्थ्यांना ३ कोटी ६ लाख रुपये अनुदान खर्च झाले असे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com