Crop Damage Compensation : पिकांच्या नुकसानीपोटी ३ कोटींचे अनुदान वितरित

चालू वर्षी अतिवृष्टीमुळे जून ते ऑगस्टदरम्यान जिल्ह्यातील ९ हजार १९२ शेतकऱ्यांच्या २ हजार २४७ हेक्टर ८५ आर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते.
Crop Damage
Crop DamageAgrowon

पुणे : चालू वर्षी अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) जून ते ऑगस्टदरम्यान जिल्ह्यातील ९ हजार १९२ शेतकऱ्यांच्या २ हजार २४७ हेक्टर ८५ आर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान (Crop Damage) झाले होते. त्यासाठी राज्य शासनाच्या वतीने निविष्ठा अनुदान (Agriculture Input Subsidy) म्हणून एकूण ३ कोटी १८ लाख ४५ हजार रुपये रक्कम तालुक्यांना वितरित करण्यात आले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

जिल्ह्यात जून ते ऑगस्ट या कालावधीमध्ये २ हजार १७९ हेक्टर ५ आर वरील जिरायती पिके, ३२ हेक्टर ६५ आर क्षेत्रावरील बागायती पिके, तर ३६ हेक्टर १५ आर क्षेत्रावरील बहुवार्षिक पिकांचे नुकसान झाले. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या निर्देशानुसार प्रशासनाने तातडीने नुकसानीचे पंचनामे केले.

त्यानुसार शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासन नियमानुसार निधीची मागणी करण्यात आली होती. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या होत्या. नैसर्गिक आपत्तीच्या घटनांमध्ये बाधित व्यक्तींना केंद्र शासनाच्या नैसर्गिक आपत्ती निकषाच्या धर्तीवर राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून (एसडीआरएफ) मदत देण्यात येते.

Crop Damage
Crop Damage : अकरा हजार हेक्टरवरील पीक पाण्यात

जून ते ऑक्टोबर २०२२ या कालावधीत अतिवृष्टी, पूर यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमध्ये होणाऱ्या शेतपिकांच्या नुकसानीसाठी वाढीव दराने निविष्ठा अनुदान स्वरूपात मदत करण्याचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय २२ ऑगस्ट २०२२ रोजी जारी केला. त्यानुसार जिरायती पिकांसाठी १३ हजार ६०० रुपये, बागायती पिकांसाठी २७ हजार रुपये, बहुवार्षिक पिकांसाठी ३६ हजार रुपये इतकी मदत ३ हेक्टरच्या मर्यादेत देण्याचा निर्णय घेण्यात आला.

Crop Damage
Crop Damage : अतिवृष्टिग्रस्तांना ७१८ कोटी मदत निधीचे वितरण सुरू

राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाने राज्य शासनाकडे १ जून ते ऑगस्ट अखेरच्या पिकांच्या नुकसानीबाबत अनुदानाची मागणी केली होती. त्यानुसार १ कोटी ५९ लाख २२ हजार रुपये प्राप्त झाले. दरम्यान, वाढीव दराने अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आल्यावर फरकाची रक्कम १ कोटी ५९ लाख २३ हजार रुपये प्राप्त झाली असून, याप्रमाणे एकूण ३ कोटी १८ लाख ४५ हजार रुपये अशी सर्व रक्कम तालुक्यांना वितरित करण्यात आली आहेक्टर वितरित करण्यात आलेली रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे काम सुरू आहेक्टर

तालुकानिहाय एकूण वितरित अनुदान

तालुका --- बाधित शेतकरी ---बाधित क्षेत्र, हेक्टरमध्ये --- वितरित अनुदान (रुपयांत)

भोर --- ३४ --- ८.६२ --- १ लाख २३ हजार ५८० रुपये

वेल्हा --- ४ --- ०.६० --- २१ हजार ६०० रुपये

मुळशी --- ९ --- २.२० --- २९ हजार ९२० रुपये

मावळ -- ३६१ --- ३३.९३ --- ४ लाख ६१ हजार ४४८ रुपये

खेड --- १,१६४ --- २५९.८ --- ३७ लाख २८ हजार २३० रुपये,

आंबेगाव --- १६८५ --- २५३.०७ --- ३६ लाख २६ हजार १४ रुपये,

जुन्नर --- ५६३५ --- १६२२.२६ --- २ कोटी २० लाख ६२ हजार ७३६ रुपये,

शिरूर --- ४९ --- ९.३५ --- २ लाख ८ हजार ९०० रुपये,

पुरंदर --- १६७ --- २२.४७ --- ३ लाख ५ हजार २९२ रुपये,

बारामती --- २ --- १.१७ --- ४२ हजार १२० रुपये,

इंदापूर --- ८२ --- ३४.३१ --- १२ लाख ३५ हजार १६२ रुपये.

जिल्हाधिकाऱ्यांकडून नुकसानीचा आढावा

परतीच्या पावसामुळे सोमवारी जिल्ह्यातील काही भागांत मुसळधार पाऊस झाल्याने शेतीपिकांचे नुकसान झाले. तसेच बारामती तालुक्यात नदीला पूर आल्याने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी आज सर्व संबंधित यंत्रणांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. दोन दिवस काही भागात पावसाची शक्यता असल्याने सर्व यंत्रणांनी सतर्क राहण्याच्या सूचना देखील त्यांनी दिल्या आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com