Animal Husbandry : पशुसंवर्धन विभागात ३ हजार १९३ पदे रिक्त

राज्यात ‘लम्पी स्कीन’ आजाराचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी पशुसंवर्धन विभागातील रिक्तपदांचा प्रश्न कायम आहे. विविध संवर्गातील एकूण ६ हजार ८६३ मंजूर पदांपैकी ३ हजार १९३ पदे रिक्त आहेत.
Animal Husbandry Department
Animal Husbandry DepartmentAgrowon

अमरावती : राज्यात ‘लम्पी स्कीन’ (Lumpy Skin) आजाराचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी पशुसंवर्धन विभागातील (Animal Husbandry Department) रिक्तपदांचा प्रश्न कायम आहे. विविध संवर्गातील एकूण ६ हजार ८६३ मंजूर पदांपैकी ३ हजार १९३ पदे रिक्त आहेत.

त्यामुळे पशूंना योग्य ती सेवा मिळत नसल्याने त्यांचा जीव धोक्यात आला आहे. सोबतच पशुधन वाचविण्यासाठी पशुमालकांना खासगीत महागडे उपचार घेण्याची वेळ आली आहे.

Animal Husbandry Department
Animal Husbandry Department Recruitment : पशुसंवर्धन विभागाच्या ८६७ पदांची भरती रद्द

राज्यात गेल्या वर्षी ‘लम्पी स्कीन’ आजाराने पशुधनाचे मोठे नुकसान झाले आहे. ऑगस्ट महिन्यात सर्वप्रथम ‘लम्पी स्कीन’चा प्रादुर्भाव आढळून आला होता. नोव्हेंबरअखेर राज्यातील २९१ तालुक्यांमध्ये या आजाराने ११ हजार ५४७ पशूंचा मृत्यू झाला.

राज्यात एकूण १ कोटी ३९ लाख ९२ हजार गोवर्गीय पशुधनापैकी १ कोटी ३९ लाख ७८ हजार पशुधनास ‘लम्पी स्कीन’ प्रतिबंधात्मक गोटपॉक्स लसीकरण करण्यात आल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाने दिली आहे.

Animal Husbandry Department
Animal Husbandry Scheme : ‘पशुसंवर्धन’च्या योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

राज्यात पशुसंवर्धन विभागात गट अ श्रेणीतील २ हजार ६४४ मंजूर पदांपैकी ४९७ पदे, तर गट ब संवर्गातील ३६६ पदे रिक्त आहेत. या संवर्गात एकूण ४१९ पदे आहेत. गट क मधील ११२७ पदांवर नियुक्त्याच झालेल्या नाहीत. १८९५ पदे या संवर्गात मंजूर आहेत.

गट ड वर्गातही मनुष्यबळाची मोठी उणीव आहे. १९०५ पैकी १२०३ पदे अजूनही रिक्तच आहेत. या विभागात एकूण ६८६३ पदे मंजूर असताना ३१९३ पदे रिक्त आहेत. ३६७० पदांवर कर्मचारी असून त्यांच्या भरवशावर हा विभाग गाडा हाकत आहे.

राज्यात श्रेणी एकचे २ हजार ५३४ पशुवैद्यकीय दवाखाने कार्यरत आहेत. मात्र तेथील पशुधन विकास अधिकाऱ्यांची पदे गेल्या अनेक वर्षांपासून भरण्यात आलेली नाहीत. काही ठिकाणी तर ड्रेसर व शिपाई अशा कर्मचाऱ्यांकडून उपचार केल्या जात आहेत.

कंत्राटी पद्धतीने भरणार पदे

पशुधन विकास अधिकारी या संवर्गाची २९३ पदे आणि पशुधन पर्यवेक्षकांची ११५९ पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यास मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती पशुसंवर्धन विभागाकडून देण्यात आली आहे.

यासोबतच सहायक आयुक्त (पशुसंवर्धन गट अ) ५६ व पशुधन विकास अधिकारी (गट अ) संवर्गाची २९८ रिक्त पदे सरळसेवेने भरण्याबाबत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. लोकसेवा आयोगाकडून उमेदवारांची निवड करण्यात आल्यानंतर पशुसंवर्धन विभागाला शिफारस करण्यात येणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com