Soybean : सोयाबीनच्या आगारात खरिपाच्या ३० टक्के पेरण्या बाकी

वाशीम जिल्ह्यात जूनमध्ये पेरण्या करण्यावर शेतकऱ्यांचा जोर राहतो. यंदा असमतोल पावसाने शेतकऱ्यांना अशा प्रकारची पेरणी करता आली नाही.
Soybean
Soybean Agrowon

वाशीम ः दर्जेदार सोयाबीन उत्पादनासाठी (High Quality Soybean Production) ख्याती असलेल्या वाशीम जिल्ह्यात यंदा पावसाअभावी पेरणी संथ (Slow Sowing) गतीने होत आहे. या आठवड्यात पेरणीने वेग (Kharif Sowing) घेतल्याने लागवड क्षेत्र ७० टक्क्यांपर्यंत पोचले आहे. सोयाबीन (Soybean) हे प्रमुख पीकही नियोजित क्षेत्राच्या २५ टक्के क्षेत्रावर अद्याप होऊ शकलेले नाही.

वाशीम जिल्ह्यात जूनमध्ये पेरण्या करण्यावर शेतकऱ्यांचा जोर राहतो. यंदा असमतोल पावसाने शेतकऱ्यांना अशा प्रकारची पेरणी करता आली नाही. यामुळे जसा पाऊस झाला, जमिनीत वाफसा मिळाला, तशा पद्धतीने शेतकऱ्यांनी पेरणीचे काम सुरू ठेवले. गेल्या आठ दिवसांत पेरण्यांनी अधिक वेग घेतला. यामुळे सरासरी लागवड क्षेत्र असलेल्या चार लाख ६२५३ हेक्टर क्षेत्रापैकी २ लाख ६४ हजार ७९५ हेक्टरवर पेरण्या पूर्ण झाल्या. सरासरी ७० टक्के लागवड झालेली आहे. अद्याप सव्वा लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर पेरण्या व्हायच्या आहेत.

Soybean
Kharip Sowing: देशातील खरीप पेरणीची कशी स्थिती आहे ?

जिल्हयात खरिपात सोयाबीन हेच मुख्य पीक आहे. सरासरी चार लाख हेक्टरपैकी ३ लाख हेक्टरवर सोयाबीनची लागवड होते. एकूण क्षेत्राच्या ७५ टक्के भागावर सोयाबीन राहते. हेच पीक जिल्ह्याच्या खरीप हंगामाचे नेतृत्व करते. शेतकऱ्यांच्या अर्थकारणाचा भाग बनलेले आहे. वाशीम तालुक्यात ४६ हजार ३४० हेक्टर, रिसोड ४४९६१, मालेगाव ४५०००, मंगरूळपीर ३०१४०, मानोरा २३५००, कारंजा ३२ हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झालेली आहे. जिल्ह्यात सोयाबीनची २५ टक्के क्षेत्रावर पेरणी व्हायची आहे.

सोयाबीनच्या सोबतीने आंतरपीक म्हणून लागवड केल्या जाणाऱ्या तुरीची आजवर ४० हजार हेक्टरवर पेरणी आटोपली आहे. जिल्ह्यात मूग उडदाचे क्षेत्र घटण्याच्या मार्गावर दिसत आहे.

या हंगामात मुगाची अवघी १३३८ हेक्टर व उडदाची १६२५ हेक्टरवर पेरणी झाली. कपाशीचे लागवड क्षेत्र यंदा थोडे समाधानकारक दिसत आहे. सरासरी १९ हजार २४५ हेक्टर नियोजित क्षेत्र असून आतापर्यंत १७ हजार १८९ हेक्टरवर पेरण्या झालेल्या आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com