Water Stock : अमरावती धरणात ३० टक्के साठा

अमरावती धरणातील पाण्याची रब्बी हंगामासाठी दोन आवर्तने सोडण्यात आली आहेत. त्यातून २५ टक्के जलसाठा कमी झाला आहे.
Water Stock
Water Stock Agrowon

Amaravati Dam दोंडाईचाः मालपूर (ता. शिंदखेडा) येथील अमरावती धरणातील पाण्याची रब्बी हंगामासाठी (Rabi Season) दोन आवर्तने सोडण्यात आली आहेत. त्यातून २५ टक्के जलसाठा (Water Stock) कमी झाला आहे.

धरणात आता केवळ ३० टक्के जलसाठा शिल्लक असून, अजून एक आवर्तन सोडण्यात येणार आहे. त्यामुळे उन्हाळ्यात पाण्याची पातळी (Water Level) तळ गाठणार आहे. पाण्याचे योग्य पद्धतीने जतन करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Water Stock
Contaminated water supply : सव्वाशे गावांना दूषित पाणीपुरवठा

जलाशयाच्या उपशातून व डाव्या-उजव्या कालव्यातून सोडलेल्या आवर्तनातून १६२ हेक्टर जमीन सिंचनाखाली आली आहे, असे संबंधित विभागाने सांगितले. फेब्रुवारीअखेर शेवटचे तिसरे आवर्तन सोडण्यात येणार आहे, अशी माहिती अमरावती धरणाचे शाखा अभियंता पीयूष पाटील यांनी सांगितले.

यंदा अमरावती धरणात फक्त ४९ टक्के जलसाठा झाला होता. मागील वर्षी ९ टक्के साठा शिल्लक होता. असा एकूण ५५ टक्के जलसाठा असल्याने निम्मा खाली होता.

गहू पिकासाठी डिसेंबर-जानेवारी या दोन महिन्यांत प्रत्येकी एक आवर्तन सोडण्यात आले. रब्बी हंगामासाठी उजव्या कालव्यातून पाच दिवस, तर डाव्या कालव्यातून चार दिवस पाणी सोडण्यात आले. सुमारे ६२ हेक्टर जमीन सिंचनाखाली आली तर जलशय उपशातून शंभर हेक्टर सिंचन झाले आहे.

Water Stock
Water Resource : कल्लोळामधील पाणी का थांबले?

धरणात शंभर टक्के भरल्यास दोन हजार ६०० हेक्टर जमीन सिंचनाखाली येऊ शकते असे नियोजन आहे. अद्याप धरण पूर्ण क्षमतेने भरलेच नाही. यंदाच्या रब्बीसाठी दोन आवर्तनांतून २५ टक्के पाणी खाली होते.

त्यातून फक्त ६२ हेक्टर जमीन सिंचनाखाली येते. नेमके पाणी कुठे मुरते हे पाहिले पाहिजे. भविष्यात सर्वत्र सिंचनासाठी टाळमेळ कसा बसेल हा प्रश्न शेतकऱ्यांना आहे.

मोजमाप पट्टी अस्पष्ट

पाण्याची पातळी खाली गेली आहे. मोजमाप पट्टीवरील अंक अस्पष्ट असल्याने किती जलसाठा आहे हे योग्यरीत्या कळत नाही. त्यामुळे पाण्यातील मोजमाप पट्टी बसविण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com