‘डीएसटीए’च्या अधिवेशनात ३० शोधनिबंध सादर होणार

‘द डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन’च्या (डीएसटीए) यंदाचे अधिवेशन पुण्यात होत आहे. यानिमित्ताने देशाच्या साखर उद्योगातील नवे तांत्रिक बदल व यांत्रिक विकासाचा वेध घेणारे ३० शोधनिबंध सादर होणार आहे.
DSTA
DSTAAgrowon

पुणे ः ‘द डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन’च्या (Deccan Sugar Technology Association) (डीएसटीए) यंदाचे अधिवेशन पुण्यात होत आहे. यानिमित्ताने देशाच्या साखर उद्योगातील (Sugar Industry) नवे तांत्रिक बदल व यांत्रिक विकासाचा वेध घेणारे ३० शोधनिबंध (Research Paper On Sugar Technology) सादर होणार आहे.

DSTA
Sugar Export : महाराष्ट्राला यंदाही साखरनिर्यातीची सर्वाधिक संधी

‘डीएसटीए’च्या मागील अधिवेशनाचे उद्‌घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले होते. त्यात श्री. गडकरी यांनी इथेनॉल धोरणविषयक महत्त्वपूर्ण भाष्य केले होते. पुण्यात १८ व १९ सप्टेंबरला होणाऱ्या यंदाचे उद्‌घाटन माजी केंद्रीय कृषिमंत्री व वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे (व्हीएसआय) अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते होत आहे. यावेळी ‘शुगर एक्स्पो’चे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात साखर उद्योगातील विविध कंपन्यांच्या उत्पादनांची व तंत्रज्ञानविषयक प्रणालीची माहिती मिळणार आहे.

DSTA
Sugar Export : केंद्राची ७.७७ लाख टन साखर निर्यातीस परवानगी

डीएसटीएचे अध्यक्ष एस. एस. गंगावती, उपाध्यक्ष एस. एस. भड, एस. एस. शिरगावकर व तांत्रिक उपाध्यक्ष व्ही. पी. शिंदे यांच्याकडून सध्या अधिवेशनाच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला जात आहे. देशभरातील अंदाजे एक हजार तंत्रज्ञ यावेळी उपस्थित राहणार आहेत. साखर उद्योगातील अभ्यासक, तज्ज्ञ, धोरणकर्ते, कृषी शास्त्रज्ञ तसेच प्रयोगशील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अधिवेशनासाठी निमंत्रित केले जात आहे. साखर व उपपदार्थ यांच्या देशांतर्गत व निर्यात बाजारात काम करणाऱ्या यंत्रणा या उपक्रमात सहभागी होत आहेत.

याच अधिवेशनात डीएसटीएची नवी कार्यकारिणी आपल्या पदाची सूत्रे स्वीकारणार असून अध्यक्षपदाची जबाबदारी आता श्री. भड सांभाळणार आहेत. ‘अॅग्रोवन’शी बोलताना ते म्हणाले की, ‘‘देशाच्या साखर उद्योगाला दिशा देण्यात तंत्रज्ञ व शास्त्रज्ञांचा बहुमोल वाटा असून या दोन्ही घटकांचे प्रतिनिधित्व डीएसटीए करते. अधिवेशनात ३० पेक्षा जास्त शोधनिबंध सादर होतील. त्यात साखर उद्योगातील तंत्रज्ञानाच्या नव्या संधी आणि वाटचालीचा आढावा घेतलेला असेल. साखर कारखान्यांचा विकास हा नेहमी नवी यंत्रे, अत्याधुनिक उपकरणे व प्रक्रिया उद्योगातील संशोधनावर अवलंबून असतो. अधिवेशनाच्या निमित्ताने ही ज्ञानसंपदा राज्यातील साखर कारखान्यांना एकाच व्यासपीठावर मिळणार आहे.’’

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com