Pune ZP Loan : पुणे ‘झेडपी’च्या दहा हजार बचत गटांना ३०० कोटीचे कर्ज

Mahila Bachat Gat : ग्रामीण भागाच्या अर्थव्यवस्थेत महिला बचत गटांचे महत्त्व वाढत असून या गटांकडून चालविल्या जाणाऱ्या लघु उद्योगांची भूमिका महत्त्वाची असते.
Agriculture Economy
Agriculture EconomyAgrowon

Pune News : ग्रामीण भागाच्या अर्थव्यवस्थेत (Rural Economy) महिला बचत गटांचे (Women Self Help Group) महत्त्व वाढत असून या गटांकडून चालविल्या जाणाऱ्या लघु उद्योगांची भूमिका महत्त्वाची असते.

कोरोना काळात कोलमडलेल्या बचत गटांचे आर्थिक चक्र पुन्हा रुळावर यावे यासाठी पुणे जिल्हा परिषदेने जवळपास दहा हजार बचत गटांना यावर्षी तब्बल ३०० कोटी रुपयांचे कर्ज स्वरूपात आर्थिक साहाय्य दिले आहे.

या मोठ्या आर्थिक पाठबळामुळे जिल्ह्यातील शेकडो बचत गटांना एक उभारी मिळाली आहे.

पुणे जिल्हा परिषदेने महिला बचत गटांना लघु उद्योगासाठी प्रोत्साहित देण्याची भूमिका घेतली आहे. जिल्ह्यात २५ हजार महिला बचत गट आहेत. आतापर्यंत दोन वर्षामध्ये पाचशे कोटींचे कर्ज विविध बँकाकडून उपलब्ध करून देण्यात आले आहे.

Agriculture Economy
Sindhudurg ZP budget: सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अंदाजपत्रकात दुपटीने वाढ

जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून ही मदत केली जात आहे. बहुतांश बचत गटांनी दूध उत्पादन, डेअरीचे पदार्थ, कुक्कुटपालन, मसाले, पापड, लोणचे करण्यावर भर दिला आहे. काही बचत गटांनी आधुनिक उपकरणे खरेदी करून त्यांचा व्यवसाय वाढवला, असल्याचे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक शालिनी कडू यांनी सांगितले.

दरम्यान, कोरोनाच्या काळात गृहिणींना आर्थिक मदत देणाऱ्या बचत गटांची संख्या पाचपटीने वाढली आहे. राज्यात सर्वाधिक बचत गट हे पुणे जिल्ह्यात आहेत. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील बचत गटांची झपाट्याने झालेल्या वाढीमुळे जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे उद्दिष्ट जिल्हा परिषदेने ठेवले असल्याचेही जिल्हा परिषद प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Agriculture Economy
Pune ZP Election : आता उत्कंठा आरक्षणाची

पुणे जिल्ह्यात रोजगार निर्माण करणारे उद्योग सुरू करण्यासाठी बचत गटांना कर्जपुरवठा करण्यात पुणे जिल्हा राज्यात अव्वल स्थान मिळविले आहे.

गेल्या तीन वर्षापासून बचत गटांना कर्जपुरवठा करण्यात येत आहे. विशेष म्हणजे या कर्जाच्या माध्यमातून जिल्ह्यात किमान ६ हजार २५० नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत.

- आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे जिल्हा परिषद

मागील तीन वर्षात झालेला कर्जपुरवठा :

आर्थिक वर्ष -- रक्कम, रुपये

२०१९-२० --- ५८ कोटी रुपये

२०२१-२२ -- २०२ कोटी रुपये

२०२२-२३ --- ३०० कोटी रुपये

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com