Rural Employment : ग्रामपंचायत स्तरावर ३,०३३ कामे उपलब्ध

जिल्ह्यात कारंजा तालुक्यातील ८९२ कामे ग्रामपंचायतस्तरावर ९१ कामे यंत्रणास्तरावर अशी एकूण ९८३ कामे शेल्फवर आहेत. या कामामध्ये ग्रामपंचायतस्तरावर २५ हजार आणि यंत्रणास्तरावर सहा हजार ३५० असे एकूण ३१ हजार ३५० कामे मजूर क्षमतेची आहे.
Employment Guarantee Scheme
Employment Guarantee Scheme Agrowon

वाशीम : जास्तीत जास्त मजुरांना (Labor) जिल्ह्यात रोजगार (Employment) उपलब्ध करून देण्यासोबतच कामानिमित्त होणारे स्थलांतर रोखण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (Employment Guarantee Scheme) जिल्ह्यात ग्रामपंचायत क्षेत्रातील वैयक्तिक व सार्वजनिक स्वरूपाची कामे सन २०२२-२३ या वर्षामध्ये ६ लाख ८३ हजार १२६ मजूर क्षमतेची तीन हजार ३३ कामे शेल्फवर ठेवण्यात आली आहे. मजुरांनी यासाठी अर्ज करावेत, असे आवाहन केले आहे.

जिल्ह्यात कारंजा तालुक्यातील ८९२ कामे ग्रामपंचायतस्तरावर ९१ कामे यंत्रणास्तरावर अशी एकूण ९८३ कामे शेल्फवर आहेत. या कामामध्ये ग्रामपंचायतस्तरावर २५ हजार आणि यंत्रणास्तरावर सहा हजार ३५० असे एकूण ३१ हजार ३५० कामे मजूर क्षमतेची आहे.

Employment Guarantee Scheme
Employment : मेगा भरतीचा फुसका बार

मालेगाव तालुक्यातील १०७ कामे ग्रामपंचायस्तरावर ४९ यंत्रणास्तरावर अशी एकूण १५६ कामे शेल्फवर असून ग्रामपंचायतस्तरावर नऊ हजार ६३० यंत्रणास्तरावर एक लाख सात हजार ६६८ अशी एकूण एक लाख १७ हजार २९८ मजूर क्षमता आहे. मंगरूळपीर तालुक्यात ३६१ कामे ग्रामपंचायतस्तरावर आणि १३३ कामे यंत्रणास्तरावर अशी एकूण ४९४ शेल्फवर आहेत.

Employment Guarantee Scheme
Employment Guarantee Scheme : रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहरींची कामे

रिसोड तालुक्यात ग्रामपंचायतस्तरावर १७६ कामे आणि यंत्रणास्तरावर १६३ कामे अशी एकूण ३३९ कामे शेल्फवर आहे. जिल्ह्यातील मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी इच्छुक व्यक्तींनी ग्रामसेवक/ ग्रामरोजगार सेवक यांच्याकडून काम मागणी अर्जाचे नमुने घेऊन वैयक्तिक किंवा सामूहिक काम मागणी अर्ज नमुना क्रमांक ४ मध्ये जॉब कार्ड क्रमांक व कामाचा कालावधी नमूद करून स्वाक्षरी करावी.

सोबत आधार कार्ड व आधार क्रमांक लिंक करण्यात आलेल्या बँक पासबुकची छायांकित प्रत अर्जासोबत देणे आवश्यक राहील. काम मागणीचा हा अर्ज ग्रामपंचायतीकडे देण्यात येऊन त्याची पोहोच ग्रामसेवकांकडून घ्यावी. ग्रामसेवकाकडून काम मागणी अर्जाची पोहोच मिळाली नसल्यास मजुरांनी पंचायत समिती/ तहसीलस्तरावरील कक्षाकडे तक्रार करावी. काम मागणी केलेल्या मजुरांना १५ दिवसांच्या आत काम उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com