Farmers Update : मराठवाड्यात १२० दिवसांत ३०५ शेतकरी आत्महत्या

Maharashtra Farmer : जानेवारी ते एप्रिलदरम्यान आठही जिल्ह्यांतील आकडेवारी
Farmer Suicide
Farmer SuicideAgrowon

Chhatrapati Sambhajinagar News : दुष्काळ, अतिवृष्टी, सततचा पाऊस, आदी नैसर्गिक आपत्तीसह सुलतानी संकटाने ग्रासलेल्या मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत जानेवारी ते एप्रिल २०२३ या चार महिन्यांत तीनशे पाच शेतकऱ्यांनी आपली जीवन यात्रा संपवली आहे.

सातत्याने होत असलेल्या शेतकरी आत्महत्यांमुळे समाजमन सुन्न असून, मराठवाड्यातील प्रशासनाने शेतकरी आत्महत्यांमागील कारणमीमांसा शोधण्यासह त्या रोखण्यासाठी उपाय करण्याकरिता सर्वेक्षणाची मोहीम हाती घेतली आहे.

कधी नैसर्गिक आपत्ती तर कधी सुलतानी संकटामुळे शेती व्यवसाय कायम अडचणींचा ठरताना दिसतो आहे.

त्याचा थेट परिणाम शेतकरी कुटुंबातील कर्त्या पुरुषाच्या मनावर आघात करण्यापर्यंत होत आहे.

परिणामी, परिस्थितीसमोर हतबल झालेला शेतकरी कुटुंबातील व्यक्ती आपली जीवन यात्रा संपवित असल्याचे अनेक उदाहरणावरून पुढे आले आहे.

Farmer Suicide
Farmer Suicide : मराठवाड्यात सहा महिन्यांत ४६६ शेतकरी आत्महत्या

शासन शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे सांगत असले तरी शेतकरी आत्महत्या मात्र थांबताना दिसत नाहीत.

यंदा जानेवारी ते एप्रिल २०२३ दरम्यान ३०५ शेतकरी आत्महत्या झाल्या. त्यामध्ये सर्वाधिक ८१ आत्महत्या बीड जिल्ह्यात झाल्या.

त्या पाठोपाठ धाराशिव, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, परभणी, लातूर, जालना आदी जिल्ह्यांचा शेतकरी आत्महत्या बाबत क्रमांक लागतो.

सर्वांत कमी ११ आत्महत्या हिंगोली जिल्ह्यात झाल्याची बाब विभागीय आयुक्तालयाच्या माहितीवरून पुढे आली आहे. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या प्रकरणातील १७० प्रकरणे शासनाच्या मदतीसाठी पात्र झाली.

तर ३५ शेतकरी आत्महत्या शासनाच्या घोषित मदतीसाठी अपात्र ठरल्या आहेत. याशिवाय शंभर शेतकरी आत्महत्यांची प्रकरण चौकशीत असल्याची माहिती विभागीय आयुक्तालयाच्या सूत्रांनी दिली.

Farmer Suicide
Farmer Suicide : पंधरा तासाला एक शेतकरी आत्महत्या

जिल्हानिहाय शेतकरी आत्महत्यांची प्रकरण
छत्रपती संभाजीनगर ३५
जालना २२
परभणी २६
हिंगोली ११
नांदेड ४७
बीड ८१
लातूर २३
धाराशिव ६०

चौकशीत असलेली जिल्हानिहाय प्रकरण
छत्रपती संभाजीनगर ३
जालना ११
परभणी १८
हिंगोली ८
नांदेड ५
बीड ३२
लातूर १३
धाराशिव ८

मदतीस पात्र ठरलेली शेतकरी आत्महत्यांचे प्रकरणे
छत्रपती संभाजीनगर ३०
जालना ११
परभणी ६
हिंगोली २
नांदेड ३८
बीड ३३
लातूर ९
धाराशिव ४१

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com