Sugarcane FRP : जरंडेश्‍‍वर कारखान्याचा ३०६ रुपयांचा दुसरा हप्ता

पश्‍चिम महाराष्ट्रातील अग्रगण्य चिमणगाव (ता. कोरेगाव) येथील जरंडेश्‍वर शुगर मिल्सने २०२१-२२ मधील गळीत हंगामातील ३०६ रुपयांचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांच्‍या बँक खात्यात जमा केल्याची माहिती संचालक सचिन सिनगारे यांनी दिली.
Sugar Factory
Sugar FactoryAgrowon

पळशी, जि. सातारा : पश्‍चिम महाराष्ट्रातील अग्रगण्य चिमणगाव (ता. कोरेगाव) येथील जरंडेश्‍वर शुगर मिल्सने (Jarandeshwar Sugar Mill) २०२१-२२ मधील गळीत हंगामातील ३०६ रुपयांचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांच्‍या बँक खात्यात जमा केल्याची माहिती संचालक सचिन सिनगारे यांनी दिली.

कोरेगाव, खटावसह सातारा जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आधारवड असलेल्या जरंडेश्‍वर शुगर मिल्सने २०२१-२२ चा गळीत हंगाम यशस्वी केला असून, उच्चांकी गाळप करत उच्चांकी दोन हजार ९०६ एवढा दर दिल्याचे श्री. सिनगारे यांनी सांगितले. ते म्हणाले, की गेल्या वर्षी उसाची अवस्था अत्यंत वाईट होती.

Sugar Factory
Sugar Mill : शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी साखर कारखाना कटिबद्ध

जिल्ह्यातील खटाव, माण, वाई, जावळी, खंडाळ्यासह सातारा तालुक्यातील ऊस गाळपाविना शिल्लक राहण्याची भीती होती. त्या वेळी ऊसतोडणी यंत्रणा वाढवत प्रसंगी हार्वेस्टरचा प्रभावी वापर करत जरंडेश्‍वर शुगर मिल्सने ऊस गाळपास आणला आणि दोन टप्प्यातच पेमेंट देऊन शेतकऱ्यांना सणासुदीच्या काळात दिलासा देण्याचे काम केले.

आता जरंडेश्वर शुगर मिल्सने २०२२-२३ च्या गळीत हंगामाचे नियोजन अत्यंत काटेकोरपणे केले असून, शेतकऱ्यांनी उसाच्या गाळपाविषयी चिंता करु नये. कारखान्याकडे नोंद केलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या उसाचे गाळप करण्यास जरंडेश्‍वर शुगर मिल्स कटिबद्ध आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com