‘कॅन बायोसिस’चे ‘३३ कोटी’ सेंद्रिय खत बाजारात

गेल्या अनेक दशकांपासून रासायनिक खतांचा (Chemical Fertilizer) अमाप वापर केल्यामुळे जमिनीची झालेली हानी कमी करण्याची क्षमता जैविक खतांमध्येच आहे.
Organic Fertilizer
Organic FertilizerAgrowon

नारायणगाव (जि. पुणे)ः येथे जैविक क्षेत्रातील अग्रेसर ‘कॅन बायोसिस’ या कंपनीचे नावीन्यपूर्ण ‘३३ कोटी’ या सेंद्रिय खताचे (Organic Fertilizer) अनावरण करण्यात आले. या वेळी अनिल तात्या मेहेर (कार्याध्यक्ष, ग्रामोन्नती मंडळ) हे अध्यक्षस्थानी होते, तर श्रीराम गाढवे (अध्यक्ष, भाजीपाला उत्पादक संघ) हे प्रमुख पाहुणे होते.

या कार्यक्रमाला कंपनीच्या चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर संदीपा कानिटकर, चीफ टेक्निकल ॲडव्हायझर डॉ. एस. एस. नाकट आणि कंपनीचे अधिकारी, वितरक आणि शेतकरी उपस्थित होते.

“गेल्या अनेक दशकांपासून रासायनिक खतांचा (Chemical Fertilizer) अमाप वापर केल्यामुळे जमिनीची झालेली हानी कमी करण्याची क्षमता जैविक खतांमध्येच आहे. मातीच्या संवर्धनासाठी येत्या काळामध्ये जैविक निविष्ठांचा वापर वाढवण्याची आवश्यकता आहे.” असे प्रतिपादन अनिल तात्या मेहेर यांनी केले. “माती बिघडली की शेती बिघडते” हे तात्यांनी प्रत्यक्ष अनुभवले असून, गत ४० वर्षांपासून जैविक घटकांचा वापर करून द्राक्ष व अन्य पिके कशी घेतली, याविषयीही त्यांनी माहिती दिली.

श्रीराम गाढवे यांनी भाजीपाला (Vegetable) पिकांच्या उत्पादन आणि खर्च कमी करण्यासाठी जैविक निविष्ठा कशा उपयुक्त ठरू शकता, याविषयी माहिती दिली. या वेळी बोलताना कंपनीच्या चेअरमन संदीपा कानिटकर यांनी कंपनीच्या गेल्या तीस वर्षांचा आढावा घेतानाच अन्य देशांतील कृषी क्षेत्रातील घडामोडी, सॅटेलाइट मॉनिटरिंग आणि जीपीएस ट्रॅक तंत्रज्ञानाचा वापर यावर भाष्य करतानाच आपल्या शेतकऱ्यांसाठी त्याचा वापर करण्यासंदर्भात सूतोवाच केले.

जवळपास वीस देशांमध्ये कंपनीची उत्पादनांची प्रात्यक्षिके सुरू आहेत. ‘३३ कोटी’सारखी सेंद्रिय उत्पादन जमीन नक्कीच समृद्ध बनवेल, असा दावा केला. या वेळी चीफ टेक्निकल ॲडव्हायझर डॉ. एस. एस. नाकट यांनी पिकातील कीड, रोग आणि पोषण व्यवस्थापनासाठी कॅन बायोसिसची उत्पादने कशी उपयुक्त ठरतील यावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रशांत पवार (प्रमुख- मार्केट डेव्हलपमेंट आणि ट्रेनिंग इंडिया) यांनी तर आभार प्रदर्शन राहुल पारखी (चीफ सेल्स कोऑर्डिनेटर) यांनी केले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com