Farmers Incentive Scheme : सातारा जिल्ह्यातील ३३ हजार शेतकरी मदतीच्या प्रतिक्षेत

सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टीत पिकांचे मोठे नुकसान
Farmers Incentive Scheme
Farmers Incentive Scheme Agrowon

विकास जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा
सातारा : जिल्ह्यात सप्टेंबर, ऑक्‍टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीत (Heavy Rainfall) ३३ हजार ५१९ शेतकऱ्यांचे १० हजार ३६४ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले.

पंचनामे होऊन शेतकऱ्यांची यादी तयार करण्यात आली होती. पण, अद्याप ही भरपाई रक्कम (Incentive Ammount) शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली नाही. अडचणीतील शेतकऱ्यांकडे गेल्या चार महिन्यांपासून दुर्लक्ष केले जात असल्याने मदतीपासून शेतकरी वंचित राहिले आहेत.

अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात जूलै ते ऑक्‍टोबर या चार महिन्यांत शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झाले होते.

या चार महिन्यांत ३४ हजार ५०१ शेतकऱ्यांचे १० हजार ५६१.१९ हेक्‍टर क्षेत्रावरील शेतीचे ३३ टक्‍क्‍यांपेक्षा अधिक नुकसान झाले. त्यामध्ये जूलै व ऑगस्टअखेर ९८२ शेतकऱ्यांचे १९९.८५ हेक्‍टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते.

त्यापोटी २८.४२ लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले होते.

Farmers Incentive Scheme
Farmer Incentive Subsidy : तेरा हजार शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत

दरम्यान, परतीच्या पावसाने पुन्हा पिकांचे नुकसान झाले होते. यामध्ये सप्टेंबर महिन्यात आठ हजार ७६५ शेतकऱ्यांचे २९४३.५६ हेक्टर तसेच ऑक्टोबर महिन्यात २४ हजार ७५४ शेतकऱ्यांचे ७४२०.७८ हेक्टर असे एकूण ३३ हजार ५१९ शेतकऱ्यांचे १०३६४.३४ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले.

यामध्ये जिरायत, बागायत तसेच फळ पिकांचा समावेश आहे. तरीही अजूनही भरपाई दिली नसल्यामुळे शेतकऱ्यांत नाराजी आहे. परतीच्या पावसाचा दहा हजार हेक्टर क्षेत्राला फटका बसल्यामुळे खरिपाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली होती.

पावसामुळे आलेल्या अनेक नद्यांना, ओढ्यांना पूर आला. शेतात पाणी घुसले. यामुळे जमीन खरडवणे, खचणे, वाहून जाणे तसेच जमिनीत गाळ साचणे आदी प्रकारे शेतजमिनीचे नुकसान झाले.

शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानाच्या रक्कमेत अडकून अतिवृष्टीची मदत देण्याकडे शासनाने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप आहे.

Farmers Incentive Scheme
Farmer Incentive Scheme : प्रोत्साहनपर योजनेअंतर्गत पुढील याद्यांची प्रतिक्षेत शेतकरी

मदतीसाठी २२ कोटीची गरज
सातारा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे १० हजार ५६१ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. या पिकांच्या पंचनाम्यानुसार तब्बल २२ कोटी ६२ लाख रूपयांची मदत देण्यासाठी निधीची गरज आहे.

चार महिन्यांपासून ३३ हजार शेतकरी मदतीच्या प्रतिक्षेत असतानाही शासनाकडून लक्ष दिले जात नसल्यामुळे शेतकरी नाराज आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com