Rain Updates: मराठवाड्यात नैसर्गिक आपत्तीने ३४ जणांचा मृत्यू

नैसर्गिक आपत्तीने (Natural Calamity) मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील नऊ, जालना सात, परभणी एक, नांदेड १०, बीड दोन, लातूर चार तर उस्मानाबाद जिल्ह्यातील एका व्यक्तीचा समावेश आहे.
Natural Calamity
Natural CalamityAgrowon

औरंगाबाद : मराठवाड्यातील (Marathwada) आठही जिल्ह्यांत १ जूनपासून १४ जुलैपर्यंत ३४ व्यक्तींचा नैसर्गिक आपत्तीने (Natural Calamity) मृत्यू झाला आहे. त्यामध्ये वीज पडून मृत्युमुखी पडलेल्या २४ जणांसह पुरात वाहून गेल्याने मृत्यू झालेल्या ९ जणांचा तर इतर नैसर्गिक आपत्तीमुळे मृत्यू झालेल्या एका जणांचा समावेश आहे.

नैसर्गिक आपत्तीने (Natural Calamity) मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील नऊ, जालना सात, परभणी एक, नांदेड १०, बीड दोन, लातूर चार तर उस्मानाबाद जिल्ह्यातील एका व्यक्तीचा समावेश आहे. त्यापैकी वीज पडून मृत्यू झालेल्या २४ व्यक्तीमध्ये औरंगाबाद व जालना जिल्ह्यांतील प्रत्येकी सहा, उस्मानाबाद, परभणी व बीडमधील प्रत्येकी एक तर नांदेडमधील पाच व लातूरमधील चार व्यक्तींचा समावेश आहे.

पुरात (Flood) वाहून गेल्याने मृत्यू झालेल्या नऊ जणांमध्ये औरंगाबादमधील तीन, नांदेडमधील पाच व जालन्यातील एका व्यक्तीचा समावेश आहे. नैसर्गिक आपत्तीने (Natural Calamity) मृत्यू झालेल्या ३४ व्यक्तींपैकी २६ व्यक्तींच्या मृत्यूप्रकरणी मदत देण्यात आली आहे. मदत मिळालेल्यामध्ये औरंगाबादमधील नऊ, जालना पाच, परभणी व उस्मानाबामधील एक, हिंगोली व लातूरमधील प्रत्येकी चार तर बीडमधील दोन व्यक्तींच्या मृत्यूप्रकरणाचा समावेश असल्याची माहिती महसूल प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.

अडीचशेवर दुधाळ जनावरांचाही मृत्यू

जूनपासून आतापर्यंत मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात जवळपास २५१ लहान-मोठ्या दुधाळ जनावरांचा नैसर्गिक आपत्तीने (Natural Calamity) मृत्यू झाला आहे. त्यामध्ये मोठ्या २१९ तर लहान ३२ जनावरांचा समावेश आहे. ओढकाम करणाऱ्या लहान ४३ व मोठ्या ९३ मिळून १३६ जनावरांचाही नैसर्गिक आपत्तीने मृत्यू झाला आहे.

नैसर्गिक आपत्तीने (Natural Calamity) मृत्यू झालेल्या दुधाळ जनावरांमध्ये औरंगाबादमधील १२, जालना २३, परभणी २०, हिंगोली १०७, नांदेड ४६, बीड २०, लातूर ७, तर उस्मानाबाद जिल्ह्यातील लहान मोठ्या १६ जनावरांचा समावेश आहे. दुसरीकडे मृत्युमुखी पडलेल्या १३६ ओढकाम करणाऱ्या जनावरांमध्ये औरंगाबादमधील सात, जालन्यातील आठ, परभणीतील २३, हिंगोलीतील ५८, नांदेडमधील २२, बीडमधील सात, लातूरमधील तीन व उस्मानाबादमधील आठ जनावरांचा समावेश असल्याची माहिती महसूल प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com