PDCC Bank : पुणे जिल्हा सहकारी बँकेला ३५१ कोटींचा ढोबळ नफा

गेल्या आर्थिक वर्षामध्ये पुणे जिल्हा सहकारी बॅंकेला ३५१ कोटी ३९ लाख रुपयांचा ढोबळ नफा झाला आहे.
PDCC Bank
PDCC BankAgrowon

Pune News गेल्या आर्थिक वर्षामध्ये पुणे जिल्हा सहकारी बॅंकेला ३५१ कोटी ३९ लाख रुपयांचा ढोबळ नफा झाला आहे. तर बॅंकेच्या निव्वळ ‘एनपीए’ (NPA) शून्य टक्का असून, ढोबळ एनपीएमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत घट होऊन तो ४.५१ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे, अशी माहिती बॅंकेचे संचालक व विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली.

पुणे जिल्हा बॅंकेच्या सांपत्तिक स्थितीबद्दल आयोजित पत्रकार परिषद शुक्रवारी (ता. २१) आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी श्री. पवार बोलत होते. या वेळी अध्यक्ष प्रा. दिंगबर दुर्गाडे, उपाध्यक्ष सनील चांदेरे, संचालक दत्तात्रय भरणे, रमेश थोरात, अशोक पवार, भालचंद्र जगताप, प्रवीण शिंदे, पूजा बुट्टे, निर्मला जागडे बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई आदी उपस्थित होते.

श्री. पवार म्हणाले, की जिल्हा बँकेच्या एकूण ठेवी ११ हजार ४८१ कोटींच्या झाल्या असून, गेल्या वर्षभरात ९१ कोटींची वाढ झाली आहे. बँकेने मार्चअखेर ७ हजार ९७४ कोटी ३ लाख रुपयांचे कर्जवाटप केले आहे.

बँकेतील एकूण गुंतवणूक ७ हजार ७९२ कोटी रुपये असून गतवर्षीच्या तुलनेत त्यामध्ये ८.२६ टक्केनी वाढ झाली आहे. यासोबच चालू वर्षी बँकेच्या शाखेमध्येच शेतकऱ्यांना अवघ्या २० रुपयांत ई-सातबारा उतारा देण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे.

PDCC Bank
PDCC Bank Pune : ‘पीडीसीसी’ बँकेला ६८ कोटींचा नफा

जिल्हा बॅंक ही राज्यातील सर्व जिल्हा बँकांमध्ये पहिल्या क्रमांकामध्ये आहे. देशात ज्या ५३ शेड्यूल बँका आहेत. त्यामध्ये वसूल भाग भांडवल व बॅंक निधीमध्येदेखील जिल्हा बॅंक अग्रेसर असून, बँकेचा प्रोग्रेसिव्ह कव्हरेज रेश्यू ४१२ टक्के आहे.

याशिवाय बँकेमार्फत ८ टक्के दराने गृहकर्ज, सहा टक्के दराने शैक्षणिक कर्ज आणि बचत गटांना ४ टक्के व्याजदराने वित्तपुरवठा केला जातो. बँकेच्या २९४ शाखा असून, बँकेमार्फत गुगल पे या सुविधा दिली आहे.

PDCC Bank
PDCC Bank : पीडीसीसी’ बॅंकेत महिला बचत गटांच्या वस्तूचे प्रदर्शन

यासोबतच दुष्काळी भागातील अडचणीत असलेल्या विविध कार्यकारी सोसायट्यांना ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी दहा कोटींची तरतूद केली आहे.

तसेच बँकेच्या नोकरभरतीसंदर्भात एजन्सी नियुक्त करण्यासाठी सहकार विभागाला पत्रव्यवहार करण्यात आला आहे. त्यांची मान्यता मिळाल्यानंतर भरतीप्रक्रिया सुरू केली जाईल.

याशिवाय पुणे जिल्ह्यात क्षारपड जमिनीचे प्रमाण वाढत आहे. त्या जमिनी सुधारण्यासाठी शेतकऱ्यांना एकरी ९६ हजार रुपयांचे कर्ज उपलब्ध करून दिले जाईल.

मार्केट यार्ड येथील भूविकास बँकेची ३५ हजार चौरस फुटाचा भूखंड जिल्हा बँकेने २६ कोटी ७१ लाख रुपयांना विकत घेतला आहे. या व्यहाराची बयाणा रक्कम भरली आहे. यात चार कोटी रुपये भरली आहेत. त्यानंतर उर्वरित २१ कोटी रुपयांची रक्कम भरून लवकरच हा व्यवहार पूर्ण होईल. या ठिकाणी बँकेचे प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा मनोदय आहे.

...तर ‘भीमा पाटस’वर कायदेशीर कार्यवाही

भीमा पाटस कारखान्याकडून बँकेला सुमारे १०० कोटींहून जास्त रक्कम वसूल पात्र आहे. या कारखान्यावर राज्य सहकारी बँकेचेही कर्ज आहे.

पीडीसीडी बँकेनेही राज्य बँकेकडे विचारणा केली आहे. तेव्हा राज्य बँकेच्या म्हणण्यानुसार ज्या कंपनीला हा कारखाना चालवायला दिला आहे. त्या कंपनीने कर्नाटकमधील ज्या बँकेकडून कर्ज घेतले आहे.

त्या बँकेचे कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य नाही. त्यामुळे काही अडचणी आहेत. पीडीसीसी बँकेला भीमा पाटसकडून थकित पैसे आले नाहीत, तर बॅंक पुढील कायदेशीर कारवाई करेल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com